कळंब (राजेंद्र बारगुले) – कळंब तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवानी २०२४ च्या खरिप हंगामासाठी ई-पीक पाहणी करण्यास १ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत शेतकरी स्तरावर पीक पाहणी करता येणार आहे. सदरील ई- पीक पाहणी केल्यास शासनाच्या विविध योजनाचा फायदा घेण्यासाठी आवश्यक आहे. जसे MSP मिळवण्यासाठी – तुम्हाला जर तुमचा शेतमाल किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्री करायचा असेल तर त्यासाठीही तुमच्या संमतीनं हा डेटा वापरला जाऊ शकतो. पीक कर्जाच्या पडताळणीसाठी – तुम्ही ज्या पिकावर कर्ज घेतलंय, तेच पिक लावलं का,याची बँक हा डेटा पाहून पडताळणी करू शकते. पीक विमा योजनेच्या लाभासाठी – पीक विम्यासाठी अर्ज करताना नोंदवलेलं पीक आणि ई-पीक पाहणीत नोंदवलेलं पीक,यात तफावत आढळल्यास पीक पाहणीतील पीक अंतिम गृहित धरलं जातं.नुकसान भरपाईसाठी – नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास भरपाई देण्यासाठी. करीता सर्व शेतकरी बांधवाना अहवान करण्यात येते की, आपण आपल्या जमिनी/क्षेत्राची पिकाची ई-पीक पाहणी दिनांक १५ सप्टेबंर २०२४ पुर्वी पुर्ण करून घ्यावी. आपली ई- पिक पाहणी मुदतीत पुर्ण न झाल्यास शासनाचे योजनाचे विविध योजनाचा लाभ घेण्यास अपात्र राहाल.करीता सर्व शेतकरी बांधवानी दि. १५ सप्टेबंर २०२४ पुर्वी ई – पिक पाहणी पुर्ण करून घेण्यात यावी व “माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पिक पेरा”असे आवाहन तहसीलदार हेमंत ढोकले यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात