घोड्यावर बसलेले शिवाजी महाराज या मिरवणुकीचे खास आकर्षण
कळंब – कळंब तालुक्यातील हासेगाव (केज) येथे बैल पोळ्याचे मानकरी लालासाहेब यादव यांनी यावर्षी बैल पोळा सण उत्सहात साजरा केला . पाऊस वेळेत पडल्यामुळे पिके जोमात आल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात आहे.वर्षानुवर्ष बैला शेतामध्ये कष्ट करतो व त्याचे रून फेडण्यासाठी शेतकरी राजा बैलाच्या अंगावर झुली टाकून, बैलाच्या तोंडाला बाशिंग म्हणून ढाल लावून,शिंगणा वारणीस लावून सजवून त्यांची ढोल ताश्याच्या गजरात गाय व बैल यांची मिरवणूक काढली.या वर्षी मानाच्या बैला पुढे घोड्यावर शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेला मुलगा बसून मिरवणूक काढण्यात आली.फटाक्यांच्या आतशबाजीत संपूर्ण गावभर वाजत- गाजत मिरवणूक काढण्यात आली व लालासाहेब यादव यांच्या घरासमोर बैल व गाय यांची विधिवत पूजा करून मंगलाष्टिका म्हणून लग्न लावले. चौर चौर चांघ भल,पाऊस आला चला घराला.अशी घोषणा देत बैलांचे व गायींचे पूजन केले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी