August 9, 2025

हसेगाव (केज) येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

  • घोड्यावर बसलेले शिवाजी महाराज या मिरवणुकीचे खास आकर्षण
  • कळंब – कळंब तालुक्यातील हासेगाव (केज) येथे बैल पोळ्याचे मानकरी लालासाहेब यादव यांनी यावर्षी बैल पोळा सण उत्सहात साजरा केला . पाऊस वेळेत पडल्यामुळे पिके जोमात आल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात आहे.वर्षानुवर्ष बैला शेतामध्ये कष्ट करतो व त्याचे रून फेडण्यासाठी शेतकरी राजा बैलाच्या अंगावर झुली टाकून, बैलाच्या तोंडाला बाशिंग म्हणून ढाल लावून,शिंगणा वारणीस लावून सजवून त्यांची ढोल ताश्याच्या गजरात गाय व बैल यांची मिरवणूक काढली.या वर्षी मानाच्या बैला पुढे घोड्यावर शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेला मुलगा बसून मिरवणूक काढण्यात आली.फटाक्यांच्या आतशबाजीत संपूर्ण गावभर वाजत- गाजत मिरवणूक काढण्यात आली व लालासाहेब यादव यांच्या घरासमोर बैल व गाय यांची विधिवत पूजा करून मंगलाष्टिका म्हणून लग्न लावले. चौर चौर चांघ भल,पाऊस आला चला घराला.अशी घोषणा देत बैलांचे व गायींचे पूजन केले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!