March 28, 2026

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.31 ऑगस्ट रोजी 8मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 181 कारवाया करुन 1,48,750 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • शिराढोण पोलीस ठाणे: आरोपी नामे-सोजराबाई उमराव पवार, वय 70 वर्षे, रा.भाटशिपूरा ता. कळंब जि. धाराशिव या दि.31.08.2024 रोजी 16.40 वा. सु.प्रा.आ. केंद्र भाटशिपुरा ता. कळंब येथे अंदाजे 700 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-शिवाजी उत्तम नवगिरे, रा.वाठवडा ता. कळंब जि. धाराशिव हे दि.31.08.2024 रोजी 17.50 वा. सु.वाठवडा येथील तळ्याच्या पाळूवर अंदाजे 350 ₹ किंमतीची 05 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.आरोपी नामे-शैकत दस्तगीर सय्यद, रा.वाठवडा ता. कळंब जि. धाराशिव या दि.31.08.2024 रोजी 11.50 वा. सु.वाठवडा पत्र्याच्या शेड समोर अंदाजे 490 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्याअवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-रामकिसन नारायण जाधवर,रा.ताडगाव ता. कळंब जि. धाराशिव हे दि.31.08.2024 रोजी 16.15 वा. सु. ताडगाव बसस्थानक येथे पत्र्याच्या शेडसमोर अंदाजे 420 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 12 सिलबंद बाटल्याअवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये शिराढोण पो ठाणे येथे स्वतंत्र 4 गुन्हे नोंदविले आहेत.
  • वाशी पोलीस ठाणे: आरोपी नामे-रामा उजण्या काळे, वय 40 वर्षे, रा.गोलेगाव, ता. वाशी जि. धाराशिव हे दि.31.08.2024 रोजी 17.00 वा. सु. गोलेगाव शिवारात एनएच 52 हायवे रोडचे बाजूस अंदाजे 5,500 ₹ किंमतीची 55 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • मुरुम पोलीस ठाणे: आरोपी नामे-रमेश रामचंद्र राठोड, वय 42 वर्षे, रा.आलुर ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.31.08.2024 रोजी 14.30 वा. सु. आलुर ता. उमरगा येथे अंदाजे 2,900 ₹ किंमतीचे 1 लिटर 29 पिशव्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे: आरोपी नामे-संतोष सुभाष पवार, वय 35 वर्षे, रा.पाटील तांडा खुदावाडी, ता. जि. धाराशिव ह.मु. जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.31.08.2024 रोजी 17.40 वा. सु. जळकोट येथे बसस्थानक जवळ अंदाजे 1,010 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • लोहारा पोलीस ठाणे: आरोपी नामे-भैरवसिंग गोपाळसिंग राजपूत, वय 33 वर्षे, रा.तावशीगड ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.31.08.2024 रोजी 18.10 वा. सु. तावशीगड येथील शिवशंभो हॉटेलच्या बाजूस अंदाजे 1,800 ₹ किंमतीची 18 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने: जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर, तुळजापूर व आनंदनगर ठाणे हद्दीत दि.31.08.2024 रोजी 13.30 ते 16.30 वा. सु. 3 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-पाशा जिलानी तांबोळी, वय 35 वर्षे, रा.खाजानगर ता. जि. धाराशिव हे 14.10 वा. सु. तुळजापूरकडे जाणारे रोडलगत जवाहर फ्लॉवर दुकानाचे बाजूस कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,700 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आढळले. आरोपी नामे- दत्ता कशीनाथ तोडकरी, वय 55 वर्षे, रा.नेहरु चौक ता. जि. धाराशिव हे 13.30 वा. सु. बसस्थानक कडे जाणारे रोडलगत कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,000 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकास आढळले. आरोपी नामे-उमेश वंसत खांडेकर, वय 41 वर्षे, रा.काक्रंबा ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 15.15 वा. सु. काक्रंबा येथील महा लॉटरी शेजारी कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 5,160 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये संबंधीत पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.31.08.2024 रोजी 14.10 ते 20.10 वा. सु. धाराशिव शहर पो.ठाणे हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-विजय रावसाहेब गुंडरे, वय 27 वर्षे, रा. काळा मारुती चौक मारवाड गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव हे 14.10 वा. सु. काळा मारुती चौक मारवाड गल्ली येथे मिलन डे मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 480 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो.ठा.च्या पथकास आढळले.आरोपी नामे- इरशाद इलाही तांबोळी, वय 40 वर्षे, रा. झोरी गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव हे 20.10 वा. सु. छत्रपती शिवाजी चौक ते सांजा रोडलगत असलेल्या पत्र्याच्या शेड समोर मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 345 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो.ठा.च्या पथकास आढळले.यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “ मारहाण.”
  • भुम पोलीस ठाणे : आरोपी नामे- गणेश मच्छिंद्र काळे, रा. इंदीरानगर झोपडपट्टी भुम ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 27.07.2024 रोजी 11.30 वा. सु. इंदीरानगर भुम येथे फिर्यादी नामे- सुनिल मच्छिंद्र काळे, वय 30 वर्षे, रा. इंदीरानगर झोपडपट्टी भुम ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपी हा आई सोबत भांडण करत होता ते विचारण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बांधकामाची विट दंडावर मारुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अशोक जाधवर यांनी दि.30.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(2), 352 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे- अमर किरण चव्हाण, रा. मुळज ता. उमरगा जि. धाराशिव व इतर दोन इसम यांनी दि. 31.08.2024 रोजी 15.00 वा. सु. मुळज शिवारातील शेतात फिर्यादी नामे-राजु शंकर चालुक्य, वय 60 वर्षे, रा.मुळज ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतातील बांधावर बैल चारण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, हंटर व कत्तीने मारहाण करुन जखमी केले. व पुन्हा बैल चारलेस तर तुला खल्लास करुन तळ्यात टाकतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- राजु चालुक्य यांनी दि.31.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351 (2) (3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ फसवणुक.”
  • कळंब पोलीस ठाणे : आरोपी नामे- शाखाधिकारी बापुराव बाबासाहेब माने, रा. धारुर, चेरअमन- सुरेश ज्ञानोबाराव कुटे, रा. क्लॉथ सेंटर बीड ता.जि. बीड, व्हाईस चेरअमन- यशवंत वसंतराव कुलकर्णी, वसंत शांताराव सटाले, संचालक, अशिष पद्माकर पाटोदेकर, संचालक, दादाराव हरीदास उंदरे, संचालक, वैभव यशवंत कुलकर्णी, संचालक, कैलास काशीनाथ मोहिते, संचालक, शिवाजी रामभाउ पारसकर, संचालक, रविंद्र मधुकर तल्बे, संचालक,आशा पदमाकर पाटील, संचालक, रेखा वसंतराव सटाले,संचालक, रघुनाथ सखाराम सरसटे, संचालक, रविंद्र श्रीरंग यादव, संचालक, तसेच ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी जि. बीड शाखा कळंब सर्व कर्मचारी यांनी जुन 2023 पासुन ते दि. 30.06.2024 रोजी 23.59 वा.सु. ढोकी रोड कळंब ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी जि. बीड शाखा कळंब येथे फिर्यादी नामे-भागवत भास्कर लांडगे, वय 48 वर्षे, रा. खोंदला ता. कळंब जि. धाराशिव यांची व इतर ठेवीदारांची नमुद आरोपींनी संगणमत करुन आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून 61, 32, 863 मुद्दल रक्कम व त्यावरील व्याज परत न करता पैशाचा अपहार करुन फसणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- भागवत लांडगे यांनी दि.31.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 420, 409, 406, 120 (ब) सह कलम 3,4 महाराष्ट्र ठेवीदाराच्या वित्तीय संस्था मधील हित संबंधाचे संरक्षणअधिनियम 1999 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
error: Content is protected !!