कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे संस्थापक कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या ३३ व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेल्या सा.साक्षी पावनज्योतचा पुण्यस्मरण दिन विशेषांकाचे प्रकाशन दि.३० ऑगस्ट २०२४ रोजी शि.म.ज्ञानदेव मोहेकर चॅरिटेबल ट्रस्ट,कळंब व शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब च्या वतीने आयोजित सांस्कृतिक सभागृहात गुणवंत विद्यार्थी,आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार समारंभात कार्यक्रमाचे अध्यक्ष संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कुलचे संचालक मा.बी.ए.मैंदर्गी,शिवाजी महाविद्यालय रेणापूर येथील मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.जयद्रथ जाधव,राजर्षी शाहू महाविद्यालय,लातूरचे प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे,ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल,प्रा. अंकुश पाटील,संचालक डॉ.डि. एस.जाधव,प्रशासकीय अधिकारी रमेश मोहेकर,प्रकाश शिंदे,संचालक संजय भोसले,संचालक विलास पवार,प्राचार्य डॉ.सुनिल पवार आदींच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक डॉ.कमलाकर जाधव,उपसंपादक अरविंद शिंदे व कार्यकारी संपादक अविनाश घोडके,विविध विद्यालय व महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका,शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे