August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलिसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.27 ऑगस्ट रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 226 कारवाया करुन 1,68,000 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • येरमाळा पोलीस ठाणे: आरोपी नामे- दत्ता मोतीराम माळी, वय 55 वर्षे, रा. गौर, ता. कळंब जि. धाराशिव हे दि.26.08.2024 रोजी 19.00 वा. सु. गौर येथे आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 2,100 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 30 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-दत्तात्रय भिकाजी वाघमारे, वय 45 वर्षे, रा. भिमनगर रत्नापूर ता. कळंब जि. धाराशिव हे दि.27.08.2024 रोजी 20.25 वा. सु.गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 3,300 ₹ किंमतीची 33 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये येरमाळा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
  • तुळजापूर पोलीस ठाणे: आरोपी नामे-दत्तात्रय लक्ष्मण देंडे, वय 32 वर्षे, रा. काक्रंबा ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.27.08.2024 रोजी 19.00 वा. सु.मोहन शंकर बंडगर यांचे पत्र्याचे शेडचे कडेला काक्रंबा येथे अंदाजे 1,280 ₹ किंमतीची 16 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-रंजीत बाळु शेंडगे, वय 29 वर्षे, रा.ढेकरी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.27.08.2024 रोजी 19.20 वा. सु. ढेकरी गावातुन जि.प.शाळेकडे जाणारे रोडचे बाजूस अंदाजे 1,280 ₹ किंमतीची 16 लि. गावइी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
  • बेंबळी पोलीस ठाणे: आरोपी नामे-श्रीहरी नारायण इंगळे, वय 52 वर्षे, रा. राजुरी ता. जि. धाराशिव हे दि.27.08.2024 रोजी 19.30 वा. सु. समाज मंदीराचे पाइीमागे राजुरी येथे अंदाजे 1,190 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 17 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • मुरुम पोलीस ठाणे: आरोपी नामे-दिगंबर शिवाप्पा देडे, वय 48 वर्षे, रा.महादेव नगर मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.27.08.2024 रोजी 17.10 वा. सु. महादेव नगर मुरुम येथे अंदाजे 3,000 ₹ किंमतीची 29 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे: आरोपी नामे-नवनाथ मारुती पुरी, वय 38 वर्षे, रा.कवठा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.27.08.2024 रोजी 17.30 वा. सु. नळदुर्ग ते खंडोबा रोडचे शिवनेरी मटन खानावळ जवळ अंदाजे 2,200 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे: आरोपी नामे-अनिल माणिकराव सरपे, वय 44 रा. शास्त्रीनगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव, वय 44 वर्षे, रा. शास्त्रीनगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.27.08.2024 रोजी 12.30 वा. सु.बंजारा बारचे पाठीमागे उमरगा येथे अंदाजे 4,100 ₹ किंमतीची 40 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी दि.27.08.2024 रोजी 14.00 वा. सु. तुळजापूर पो.ठाणे हद्दीत यादव धर्मशाळा समोर साठे चौक तुळजापूर येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-महादेव नागनाथ पांडागळे, वय 31 वर्षे, रा.मोर्डा ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 14.00 वा. सु. यादव धर्मशाळा समोर साठे चौक तुळजापूर येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 670 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तुळजापूर पो.ठा.च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • मुरुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान मुरुम पोलीसांनी दि.27.08.2024 रोजी मुरुम पो.ठाणे हद्दीत बसस्थानक मुरुम येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- जावेद सरदार मुरशद, वय 30 वर्षे, रा. चिंचोली भुयार ता.उमरगा जि. धाराशिव हे मुरुम बसस्थानक येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 720 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले येरमाळा पो.ठा.च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • आनंदनगर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलीसांनी दि.27.08.2024 रोजी18.30 वा. स. आनंदनगर पो.ठाणे हद्दीत पंचायत समिती धाराशिव वसाहत कंपाउडचे समोर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- शुभम बिभीशन धनखे, वय 25 वर्षे, रा. वाघोली ता. जि. धाराशिव हे 18.30 वा. सु.पंचायत समिती धाराशिव वसाहत कंपाउडचे समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 810 ₹रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आनंदनगर पो.ठा.च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देवून वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • वाशी पोलीस ठाणे : आरोपी नामे-अहमद रईस सौदागर, रा. बार्शी, ता. बार्शी जि. सोलापूर यांनी दि.26.08.2024 रोजी 21.45 वा. सु. पार्डी फाटा येथे पिकअप क्र एमएच 23 ए.यु 3961 या मध्ये तीन बैल अंदाजे 75,000₹ किंमतीचे दाटीवाटीने कोंबून निर्दयतेने जनावरांचे सुरक्षीततेची खबरदारी न घेता दोरीने आवळून बांधून जनावरे कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतुक करीत असताना वाशी पो. ठाणेच्या पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम 11(1), 11(1)(ए), 11(1)(एफ), 11 (आय),11(1)(एच),प्राण्याचे परि नियम 1978 चे कलम 45, 54, 56 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे: आरोपी नामे-सचिन बबन रसाळ, वय 35 वर्षे, रा.साठेनगर धाराशिव व अनोळखी तीन इसम यांनी दि.27.08.2024 रोजी 02.05 वा. सु. दारे व ख्डिक्या नसलेली शासकीय दुध डेअरी साठेनगर धाराशिव येथील 100 फुट केबल, विधुत ग्रॅ मशीन, रेडमी कंपनीचा मोबाईल लोखंडी भंगार असे एकुण 14,300₹ किंमतीचा माल चोरुन घेवून जात असताना धाराशिव पोलीस ठाण्याचे पथकाने मिळून आला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विष्णु मधुकर वेळे, वय 34 पोलीस नाईक 1197 पनेमणुक पोलीस ठाणे धाराशिव यांनी दि.27.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-आप्पाराव महादेव जाधव, वय 65 वर्षे, रा.उमरगा चि. ता. तुळजापूर जि. धाराशिव यांच्या अंदाजे 75,000₹ किंमतीच्या म्हैशी या दि.23.08.2024 रोजी संध्याकाळी 19.00 ते दि. 24.08.2024 रोजी 06.00 वा. सु. फुलवाडी शिवारात शेत गट नं 15/6 मधून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आप्पाराव जाधव यांनी दि.27.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “अपघात “
  • मुरुम पोलीस ठाणे : मयत नामे-संजय बसाप्पा धामशेट्टी, वय 55 वर्षे, रा. येणेगुर ता. उमरगा जि. धाराशिव हे दि. 19.08.2024 रोजी 11.00 वा. सु. महेश मल्लीनाथ माळी यांचे वेल्डींगचे दुकानासमोर येणेगुर येथे रस्ता ओलांडत होते.दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 14 एलएच 6129 चा चालक नामे- प्रतिक नेताजी चौधरी, यांनी त्यांचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून संजय धामशेट्टी यांना धडक दिली. या अपघातात संजय धामशेट्टी हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर विघनेश हरिशचंद्र भोसले हे जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जयश्री संजय धामशेट्टी, वय 51 वर्षे, रा. येणेगुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.27.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281 125(अ), 125(ब) 106 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तुळजापूर पोलीस ठाणे : आरोपी नामे-विवेक वसंत पाटील, वय 40 वर्षे, हॉटेल मालक, रा. मसरे गल्ली सोलापूर, गणेश चंद्रकांत हुंबे,वय 35 वर्षे, सन ऑ सन हॉटेल मॅनेजररा. निराळे वस्ती सोलापूर यांनी दि.01.06.2024 रोजी 10.00 वा. त्यापुर्वी सनॲन्ड सन हॉटेल च्या पाठीमागे ता. तुळजापूर येथे मयत नामे- स्वप्नील अशोक सुतार, वय 26 वर्षे, रा.प्लॉट नं 123 माशाळ वस्ती ज्ञानप्रोबधनी शाळेजवळ विजापुर रोड सोलापूर हे बेशुध्द अवस्थेत असताना त्यास उपचार कामी घेवून न जाता त्यांनी जाणीवपुर्वक निष्काळजीपणा करुन मयताचे मरणास कारणीभुत झाले असुन मयताच ओळख असतानाही ओळख लपवून ठेवली. वगैरे आ.मृ 36/2024 कलम 174 सी आर पी सी चे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने फिर्यादी नामे- तात्याराव रुपाजी भालेराव, वय 42 वर्षे, सहा. पोलीस निरीक्षक नेमणुक पोलीस ठाणे तुळजापूर यांनी दि.27.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 304(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “सदोष मनुष्यवध.”
    नळदुर्ग पोलीस ठाणे : आरोपी नामे- संदीप राठोड, सुशिल राठोड, मनिषा राठोड, सर्व रा. वसंतनगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 27.08.2024 रोजी 09.30 ते 10.0 वा. सु. धनवंतरी हॉस्पीटल नळदुर्ग येथे मयत नामे- अक्षय बाळु सुरवसे, वय 26 वर्षे, रा.भिमनगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तु आमच्या जातीच्या मुलीवर प्रेम का करतो या कारणावरुन शिवीगाळ करुन तुझा बरोबर कार्यक्रम करतो असे धमकावून त्याचे मृत्युस कारणीभुत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बाळु सोपान सुरवसे, वय 52 वर्षे, रा. भिमनगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.27.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 105, 351(2), 3(5) सह अ.जा.ज.अ.प्र.कायदा कलम 3(2),(व्ही), 3(2), (व्ही.अ.) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • ” फसणुक.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- संदीपान नामदेव वाळवे, वय 50 वर्षे, रा. बौध्द नगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि. 23.08.2024 रोजी 14.00 वा. सु. ओम हॉटेलचे बाजूला हिताची ए.टी.एम मध्ये पैसे काढत असताना दोन अनोळखी इसमांनी संदीपान वाळवे यांचे ए.टी.एम कार्डचा पिन पाहुन कार्ड मशीन मधून काडून त्यांचे जवळ ठेवून त्यांचे जवळील जसराज निशात या नावाचे एटीएम कार्ड देवून संदीपान वाळवे यांचे ए.टी.एम मधून 9,700₹ काढून घेवून फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संदीपान वाळवे यांनी दि.27.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 318, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे- प्रंशात चेडे, नरसिंग तुकाराम उंदरे, चंद्रकांन्त मारुतीराव निपाणीकर, मकरंद कल्याणराव शिंगणापुरे, चंद्रकांन्त मधुकर चेडे,रत्नाकर भागवत उंदरे, दिगंबर गोपाळराव कवडे, सर्व रा. वाशी ता. वाशी, एस आर. बेळंबे लेखापरीक्षक श्रेणी 2 सहा. संस्था तुळजापूर(से.नि) यांनी दि. 01.04.2013 ते दि. 31.03.2015 रोजी 11.00 ते 17.00 वा. सु. कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथील कार्यालयात 24,70,000₹ इतक्या रक्कमेचा वैयक्तीक व स्वत:चे लाभासाठी बाजार समतिी निधी नियमबाह्य पध्दतीने बाजारसमितीचे संचालक मंडळ सभेत कोणत्याही प्रकारची मंजुरी न घेता बाजार समितीच्या व्यवहाराशी कोणत्याही प्रकारचा आर्थीक संबंध नसलेल्या त्रयस्थ व्यक्तीच्या नावे धनादेश देवून बाजार समितीच्या रक्कमेचा आर्थीक अपहार केला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-केशव सोमनाथ बोंदर, लेखापरीक्षक श्रेणी2 सहकारी संस्था परंडा, वय 40 वर्षे, रा. देवधानोरा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.27.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 403, 406, 409, 418, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

error: Content is protected !!