कळंब – कळंब तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार म्हणून गोपाळ बंकटलाल तापडिया रुजू झाले असून दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. यापूर्वी तापडिया हे धारूर तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार व धारूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी म्हणून त्यांच्याकडे चार्ज होता. त्यांचा कळंब तहसील कार्यालय येथे साबेर चाऊस यांनी शाल ,श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला. याप्रसंगी जावेद चाऊस, अच्युत मंडाळे,निर्भय घुले यांनी ही गोपाल तापडिया यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात