धाराशिव ( जिमाका) – जिम्नॅस्टिक खेळात शालेय व इतर क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंना सहभागी होता यावे,यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने जिल्हयात जिम्नॅस्टिक खेळाचे शासकीय जिम्नॅस्टिक्स क्रीडा प्रशिक्षण केंद्र,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,धाराशिव येथे सुरु केले आहे.
धाराशिव जिल्हयाकरिता डिम्पल ठाकरे यांची जिम्नॅस्टिक क्रीडा मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केलेली आहे.शहरातील इच्छुक खेळाडूंनी या जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्रात सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी डिम्पल ठाकरे,क्रीडा मार्गदर्शक 8766426884 यांच्याशी संपर्क साधावा.
More Stories
व्यावसायिक गणेश घेवारे यांना मातृशोक
भगवंताचे गुण संतांमध्ये दिसतात – ह.भ.प.अच्युत आंबीरकर महाराज
निरोगी गावाकडे वाटचाल;मौजे बोरफडी येथे ‘अनिमिया मुक्त गाव’ उपक्रमाचा भव्य शुभारंभ