August 9, 2025

ज्ञान प्रसारक मंडळाच्या सचिवपदी डॉ.अशोक मोहेकर यांची तर अध्यक्ष पदी अनिल मोहेकर यांची निवड

  • कळंब – शिक्षण क्षेत्रात मराठवाड्यातील नावाजलेली संस्था ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा या संस्थेच्या सचिवपदी डॉ.अशोकरावजी (दादा) मोहेकर तर अध्यक्षपदी अनिल (बापू) मोहेकर तसेच नूतन संचालक म्हणून प्रकाशराव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
    यानिमित्ताने मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप व प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
    या कार्यक्रमास संस्थेचे माजी संचालक प्रा.श्रीहरी बोबडे व सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक अरविंदजी शिंदे
    तसेच प्रशालेतील गुंगे एस.एन,प्रा.करंजकर, पवार एम.एम,आडणे .एस.जी,काळे बी.एन,गुरव एस.व्ही,भामरे जे.डी.,शेवाळे के.व्ही.,मडके एस.बी.
    यांची प्रमुख उपस्थिती होती.
error: Content is protected !!