August 9, 2025

सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी नामतालिका तयार करणे

  • धाराशिव (जिमाका):-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81 अन्वये सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणाची तरतूद आहे. नवीन लेखापरीक्षक नामतालिका तयार करण्यासाठी दि.23 ऑक्टोबर, 2023 से 06 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये इछुकाकडून ऑनलाईन अर्ज मागवायचे आहेत. लेखापरीक्षक नामतालिकेवर नोंदणीकृत होणेसाठी सदयस्थितीत नामतालिकेवर असलेल्या लेखापरीक्षकांची नोंदणी यापुढे देखील कायम राहणेस्तव इच्छुक असलेले व नव्याने अर्हता धारण करणारे इच्छुक लेखापरीक्षक याप्रमाणे दोन्ही प्रकरांपैकी लागू प्रकारामध्ये संबंधीतांना अर्ज करता येतील.
    सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परीपत्रक दि. 16 ऑक्टोबर 2023 अन्वये सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी सन 2024-26 या कालावधीसाठी नामतालीका तयार करणेकरीता कृति कार्यक्रम दि. 26 ऑक्टोबर 2023 ते 26 डिसेंबर 2023 असा कृति कार्यक्रम तयार केलेला आहे. तरी जिल्हयातील नामतालिकेवर असलेले लेखापरीक्षक व नव्यावे अहर्ता धारण करणारे इच्छुक लेखापरीक्षक यानी दि. 23 ऑक्टेाबर 2023 से 06 नोव्हेंबर 2023 या कालावधीत नविन नामतालिकेसाठी ऑनलाईन अर्ज व त्या संदर्भातील आवश्यक ती कागदपत्रे www.mahasahakar.maharashtra.gov.in या वेबसाईट वर आपलोड करावीत. विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. या बाबत कोणतीही अडचण आल्यास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धाराशिव या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धाराशिव यांच्यावतीने करण्यात येत आहे.
error: Content is protected !!