धाराशिव (जिमाका) – आपले सरकार पोर्टलवरील तक्रारींची दखल गांर्भीर्यांने घेवून नागरिकांची तक्रार विलंब न करता निकाली काढण्यासह प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आपले सरकार पोर्टल 2.0 काही नव्या बदलासह नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींचा 100 टक्के निपटारा होण्यासाठी आज 21 ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे जिल्हयातील अधिकारी-कर्मचारी यांचे विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सत्राचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ,जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुखमे, ई-गव्हर्नन्स तज्ञ देवांग दवे व समीर काळे यांची उपस्थिती होती.
नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतू निर्माण करणारा आपले सरकार २.० हा शासनाचा महत्वपूर्ण प्रकल्प आहे. नागरिकांसाठी ऑनलाईन पध्दतीने तक्रार दाखला करता यावी तसेच प्रशासनाने ऑनलाईन पध्दतीने अशा तक्रारींचे निवारण करावे यासाठी आपले सरकार २.० ही तक्रार निवारण प्रणाली मंत्रालयीन विभागांबरोबरच जिल्हयांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहे .
या प्रशिक्षणात आपले सरकार पोर्टलविषयी माहिती देण्यात आली.हे पोर्टल नागरिकांसाठी अत्यंत सुलभ पोर्टल आहे.पोर्टलचा वापर उत्तम प्रकारे कारावा,यातील तक्रारीचे निवारण तात्काळ होणार आहे.या पोर्टलवरील तक्रारींचा भार कमी करावा.पोर्टलमधून नागरिकांना उत्तम सेवा दिल्याने विभागाचे रेटींग वाढणार ते नागरिकच देणार आहेत.यामुळे त्यांच्या तक्रारींचे निवारण तात्काळ होणे गरजेचे आहे.विभागाला मिळणारे रेटींग हे पोर्टलवर दिसणार असल्याने नागरिकांना त्या विभागाकडून देण्यात येणारे सेवांसह ती तक्रार किती वेळात सोडविली याचीही माहिती मिळणार आहे. पोर्टलवर आलेल्या तक्रारीची प्रथम वेळीच सोडवणूक करावी.तसेच एक तक्रार अनेक विभागांशी निगडीत असेल तर त्या सर्व विभागांनी एकत्रित येवून ती तक्रार निकाली काढावी असेही यावेळी प्रशिक्षणात सांगण्यात आले.
तसेच केंद्र सरकारकडून आलेल्या तक्रारीही या पोर्टलवर आता दिसणार आहेत.नागरिकांकडून आलेल्या सुचनांचा विचार व्हावा.मात्र,प्रश्नांना उत्तरे देणे बंधनकारक नसल्याचेही प्रशिक्षणात सांगण्यात आले. आपले सरकार पोर्टल 2.0 वर अधिकारी-कर्मचारी वरिष्ठ विभागांना काही सुचनाही करु शकतात.यावेळी प्रशिक्षण दरम्यान जिल्हयातील अधिकारी-कर्मचारी यांच्या प्रश्नांचे निराकरण प्रशिक्षक यांनी केले. जिल्हयातील अधिकारी-कर्मचारी या प्रशिक्षणासाठी मोठया संख्येने उपस्थित होते.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक