August 9, 2025

स्थलांतरीत/असंघटीत कामगारांना शिधापत्रिका वितरणसाठी विशेष मोहिम

  • धाराशिव (जिमाका) – मा.सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेमध्ये 16 जुलै 2024 रोजी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्थलांतरीत/असंघटीत कामगारांना शिधापत्रिकांच्या वितरणासाठी विशेष मोहिम अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

    या प्रक्रियेमध्ये प्रचलीत नियमानुसार पडताळणी / तपासणी करुन स्थलांतरीत / असंघटीत कामगारांना उचित शिधापत्रिका वितरीत करुन शिधापत्रिकेवरील अनुज्ञेय लाभ तात्काळ देण्यात यावेत.अशा सूचना क्षेत्रीय यंत्रणेस देण्यात आल्या आहेत.

    जिल्ह्यातील सर्व विना शिधापत्रिकाधारक स्थलांतरीत / असंघटीत कामगारांनी आपल्या तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागामार्फत किंवा शासनाच्या http://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicLogin.aspx या पब्लीक पोर्टलवर लॉगीन करुन ज्यांना शिधापत्रिका नाही अशांनी तसेच ज्यांची शिधापत्रिका आहे,परंतु आधार क्रमांक संलग्न/ अद्यावत नाहीत त्यांनी या दिलेल्या लिंकवर अर्ज करावा व तहसील कार्यालयामार्फत आपली शिधापत्रिका अद्यावत करुन प्राप्त करुन घ्यावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

error: Content is protected !!