संभाजी नगर – संविधान भवन, नारळी बाग येथील संघटनेच्या कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी संपन्न झाला. त्यावेळी झालेल्या हमाल कष्टकऱ्यांच्या मेळाव्यात सदरील निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस व जय किसान आंदोलन – स्वराज अभियान चे साथी सुभाष लोमटे, अड. सुभाष सावंगीकर, उपाध्यक्ष साथी छगन गवळी, कोषाध्यक्ष साथी प्रवीण सरकटे, कागद काच पत्रा कामगार संघटनेच्या साथी आशाबाई डोके, तरुण पत्रकार साथी शेख अन्वर भाई यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी हमाल कष्टकरी व माथाडी कामगारांची जीवनरेषा आसलेल्या माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी../ शेतकऱ्यांचे सर्व शेतीमालास किमान हमी भाव जाहीर करून त्यास कायद्याचे संरक्षण द्यावे../ उदरनिर्वाहासाठी भूमिहीनांनी केलेली सरकारी ( गायरान/ जंगल..इ…) जमिनीवर केलेली अतिक्रमण नियमित करावित…/ सर्व अंगमेहनती कष्टकर्यासाठी माथाडी सारखा कायदा लागू करावा../ कष्टकऱ्यांना गुलाम बनवणाऱ्या कंत्राटी पद्धतीचे उच्चाटन करावे…/ स्त्री – पुरुषांना समान वेतन आणि समान कामास समान वेतन देण्याऱ्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी../ प्रत्येकाचे जगण्याचा घटनात्मक ( घटनेचे कलम २१..) अधिकार – हक्क अबाधित ठेवण्यासाठी ….रोजगार व वेतनाचा हक्क.. संपूर्ण शिक्षण व आरोग्य सुविधा मोफत, अन्न सुरक्षा, म्हातारपणासाठी पेन्शन आणि हक्काचे घर मिळणे या सर्व बाबी घटनेच्या मूलभूत अधिकारात अंतर्भूत कराव्यात इ प्रमुख मागण्याचे पाठपुराव्यासाठी एल्गार पुकारण्याचा निर्धार ही यावेळी कऱण्यात आला. यावेळी महात्मा फुले यांचा सत्य सर्वांचे आदिघर हा अखंड आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करून मेळाव्याचा समारोप करण्यात आला.ध्वजारोहण व कष्टकऱ्यांचा मेळावा यशस्वी करण्यासाठी साथी सर्जेराव जाधव, साथी अशोक वाघमारे,गणेश तरटे, सतीश साळवे, जालिंदर साळवे, सतीश मगरे, राजेंद्र वर्मा, प्रकाश जाधव, बाळू हिवराळे, प्रदीप सांगळे,नवगिरे, मोरे इ. विशेष परिश्रम घेतले.
More Stories
ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मित्र उपक्रम- रुपाली चाकणकर
सस्ती अदालत उपक्रमातून 560 शेतरस्ते व पाणंद रस्ते मोकळे
हमाल कष्टकऱ्यांच्या बाईक रॅली ने केले शहरात जनजागरण