August 9, 2025

दीप एन्क्लेव्ह को.ऑ. हौंसिंग सोसायटी मध्ये स्वातंत्र्य दिन संपन्न.!

  • बदलापूर (समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे) –
    भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी दीप एन्क्लेव्ह को.ऑ. हौंसिंग सोसायटी मध्ये उत्साहात पार पडला.स्वराज्यजननी जिजाऊ,माता रमाई व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व मानवमुक्तीचे प्रणेते संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उल्हासभाई आंबवणे व मुकुंदशेठ भोईर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्वामीशेठ दारवीन यांच्या हस्ते अगरबत्ती धूपाने पूजन केले.सदनिकाधारक प्रल्हाददादा चौधरी यांच्या हस्ते पुष्पांने महापुरुषांना अभिवादन केले. गेली चार दशके समर्पीत भावनेने गुरूवर्य आनंद दिघे साहेब यांच्या विचारांचा वारसा चालवणारे शिवसेना मा.ठाणे जिल्हाप्रमुख,कुळगाव बदलापूर नगरपरिषद अस्तित्वात आली तेव्हाचे पहिले नगराध्यक्ष मा.मनोहरदादा आंबवणे यांच्या पावलांवर वाटचाल सन्मानित उल्हास(भाई) आंबवणे यांच्या विचारांचा वारसा जपणा-या मा. नगरसेविका सौ.उज्वलाताई उल्हास आंबवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विकासक मा.उल्हास(भाई) आंबवणे,विकासक स्वामी शेठ दारवीन, स्थानिक मा.नगरसेवक मुकुंदशेठ भोईर, समाजसेवक मनोहर सोनवणे, समाजसेवक श्री .सावंत, श्री.मेलगे, श्री.सावंत , साळुंखे सर, कुडाळकर,सोसायटी अध्यक्ष रमेश जगताप, खजिनदार सौ.सविता शेलार,सौ.ज्योत्सनाताई कांबळे,श्री.सचिन खामकर, सौ.प्रणालीताई मांजरेकर, गणेशशेठ शेलार,श्री.परेश खेडेकर व सौ.खेडेकर,उमेश नारखेडे, सचिन खामकर,परबदादा ,सौ.मुळे, सहारा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.शर्मिला सोनवणे,सौ.वृषाली पवार,सौ.माया गुप्ता,आदी बाहेरील राष्ट्रप्रेमी सर्जनांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.शत्रूराष्ट्र पाकिस्तान असूनही भारत पाकिस्तान वाघाबॉर्डर सीमेवरील तैनात जवानानी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.मात्र सोसायटीतील काही रहिवाशांनी राष्ट्रीय उत्सवाकडे संकोचीत वृत्तीने पाठ फिरवली .यावेळी सचिव तात्यासाहेब सोनवणे यांनी झेंडा वंदन झाल्यावर उपस्थितांना राष्ट्रीय जनजागृती अभियानाचा धागा म्हणून भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्याचे पालन व बंधूभाव वृध्दिंगत व्हावा म्हणून सामुहिक शपथ दिली.भारत माझा देश आहे,सारे भारतीय माझे बांधव आहेत.जयहिंद! जयभारत
error: Content is protected !!