August 9, 2025

साहित्यरत्न लोक शाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

  • कळंब – लसाकम शाखा कळंब,जोशाबा पतसंस्था,ज्ञानदा बहुउद्देशिय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१ ऑगस्ट २०२४ रोजी साहित्यरत्न लोक शाहीर डॉ.अण्णाभाऊसाठे यांची 104 वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी केंद्रप्रमुख गामोड यांनी अण्णाभाऊच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पाहार अर्पण केला.लसाकम तालुका प्रमुख दिलीप मोरे ईटकुरकर यांनी प्रस्तावना करताना अण्णाभाऊच्या कार्याचा गुणगौरव केला,श्रमिक साहित्याचे निर्माते म्हणुन अण्णाचे साहित्य जागतिक स्तरावर पोहचले.
    अण्णाभाऊना साहित्य क्षेञातील ज्ञानपीठ पुरस्काराबरोबर भारतरत्न देखील मिळाला पाहीजे,असे प्रतिपादन केले.
    यावेळी लसाकमचे पदाधिकारी बी.एन.भंडारे,सोमनाथ कसबे,बाळासाहेब कांबळे,जोशाबा पतसंस्थेचे सचिव महेंद्र रणदिवे, सचिन भांडे, ज्ञानदा बहुउद्धेशिय मंडळ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बंडु आबा ताटे उपस्थीत होते. यानंतर नवनाथ आडसुळ,शरद खंडागळे, संतोष सुरवसे,वरपे शंकर,धीरज जानराव,गोडसे शहाजी इ.मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सुञसंचालन बाळासाहेब कांबळे तर आभार लसाकम कार्याध्यक्ष भंडारे बी.एन.यांनी केले.
error: Content is protected !!