August 9, 2025

पन्नालालजी सुराणा यांच्या वाढदिवसानिमित्त व राजश्री शाहू पुरस्कार मिळाल्याबद्दल भव्य सत्कार

  • नळदुर्ग-ज्ञानदीप कलोपासक मंडळ संचलित धरित्री विद्यालय व राष्ट्रसेवा दल संचलित आपलं घर बालग्राम येथे ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यांचा वाढदिवसानिमित्त व राजश्री शाहू पुरस्कार मिळाल्याबद्दल धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघ व धाराशिव जिल्हा साने गुरुजी कथामाला यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला. पन्नालाल भाऊ सुराणा यांना कोल्हापुरातील राजश्री शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने यंदाचा राजश्री शाहू पुरस्कार वितरण झाला होता.एक लाख रुपये,स्मृतीचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पन्नालाल भाऊ सुराणा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त व पुरस्काराच्या सन्मानानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मानदअध्यक्ष एम.डी.देशमुख, मुख्याध्यापक संघ अध्यक्ष सुरेश टेकाळे, साने गुरुजी जिल्हा समिती धाराशिव अध्यक्ष डी के कुलकर्णी,साने गुरुजी कथामाला राष्ट्रीय प्रमुख कार्यवाह तथा मुख्याध्यापक सुनील पुजारी उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते भाऊंचा सत्कार शाल,पुष्पहार व बुके देऊन करण्यात आला.ज्येष्ठ विचारवंत, समाजाचे मार्गदर्शक, तरुण वर्गाचे आदर्श व आपले घरमधील अनाथ विद्यार्थ्यांचे पालक अशा बहूरंगी भूमिका बजावणाऱ्या आपल्या वयाचा विचार न करता सतत समाजसेवा करणाऱ्या पन्नालाल भाऊंचा सत्कार करण्याचे भाग्य भाग्यवंतांनाच मिळते असे उद्गगार मानद अध्यक्ष एम.डी. देशमुख यांनी काढले. सुरेश टेकाळे यांनी पन्नालाल भाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या वयातही आम्हाला कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून मिळते हे मान्य केले. डी.के.कुलकर्णी यांनी पन्नालाल भाऊंच्या कार्याचा गौरव करताना सामाजिक समस्यांचे जाणीव ठेवणार असे व्यक्तिमत्व आधी घडले नाही आणि पुढे घडणारही नाही असे उद्गगार काढले. महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक सुनील पुजारी यांनी आपल्या आयुष्यातील यशाचे श्रेय भाऊंना दिले पन्नालाल भाऊंचे स्थान माझ्या आयुष्यात सागरातील दीपस्तंभ प्रमाणे आहे असे गौरवोद्गगार त्यांच्याबद्दल काढले. त्यांच्या छत्रछायेखाली आजही आमचे आयुष्य आनंदी व समाधानी असल्याचे सर्वांना सांगितले.त्यांच्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत सर्वांनी त्यांच्याशी वार्तालाप केला. यावेळी आपले घर बालग्राम मधील सर्व कर्मचारी,धरित्री विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!