भाटशिरपुरा – दिनांक 19 जुलै 2024 रोजी कै.भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय भाट शिरपुरा या विद्यालयास श्री माधवराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मातोळा तालुका औसा येथील माजी प्राचार्य तथा ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे संचालक संजय भोसले सर यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी प्राचार्य संजय भोसले सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा शाळेच्या वतीने शाल,बुके व ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडी यांची प्रतिमा देऊन मुख्याध्यापक सुरेश टेकाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना त्यांनी आपली शाळा व आपल्या शाळेचे विद्यार्थी कसे प्रगतीपथावर राहतील याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेतील शिक्षक एस.जी.सूर्यवंशी,एच.ए.पान ढवळे, एस.एस.डिकले,बी.व्ही.ओव्हाळ व शिक्षकेत्तर कर्मचारी विनायक शिंदे, विनोद चाळक उपस्थित होते.
More Stories
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका प्रा.सौ.अंजलीताई मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट