August 9, 2025

बसची तात्काळ व्यवस्था करावी – सरला खोसे

  • भूम – तालुक्यातील अंजन सोंडा गावातील 40 ते 50 विद्यार्थी दररोज पायी प्रवास करून वाशी तालुक्यातील घाट पिंपरी येथील हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत तरी या विद्यार्थ्यांना दररोज सहा ते सात किलोमीटर प्रवास पायी करावा लागतो.ऊन वारा पाऊस अशा प्रत्येक ऋतूमध्ये हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.तेव्हा या विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था व्हावी.या उद्देशाने दिनांक 19 जुलै 2024 रोजी वाहतूक व्यवस्थापन अधिकाऱ्यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षा सरला खोसे यांनी भेट घेऊन त्यांना गावकऱ्यांच्या मागणीप्रमाणे विद्यार्थ्यांना शाळेला दररोज येण्या जाण्यासाठी एसटी बसची व्यवस्था करावी असे निवेदन दिले.
    याप्रसंगी वाशी महिला तालुकाध्य सौ.लता सातपुते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतर कार्यकर्ते हजर होते.
error: Content is protected !!