धाराशिव – दि. 19/07/2024 रोजी धाराशिव येथील कर्मवीर बालमंदिर प्राथमिक शाळेत शौक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेचे मुख्याध्यापक डॉ. रुपेशकुमार जावळे यांनी भूषविले. धाराशिव येथील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, प्रभाकर बनसोडे व विजय गायकवाड यांनी सामाजिक जाणीवेतून शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे त्यांच्यात अभ्यास करण्याची आवड निर्माण व्हावी. म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप केले. मनोगत व्यक्त करताना गायकवाड यांनी शाळेची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. विद्याथ्र्यांनी खूप अभ्यास करुन नावलौकिक वाढवावा, वेळेचा अपव्यय न करता अभ्यासात सातत्य ठेवावे, त्यामुळे यश निश्चित मिळते असे ते म्हणाले. अध्यक्ष पदावरुन बोलताना डॉ. जावळे यांनी शाळेतील उपक्रमाची माहिती सांगितली. शाळेमधून महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत गुणवत्ता यादीत 70 विद्यार्थी आल्याचे सांगितले. शाळेतील शिक्षकवृंद, सर्व स्टाप विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्यामुळेच शाळा उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे असे म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्रीमती गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पवार सर, सोमवंशी सर, श्रीमती वाघे मॅडम,श्रीमती मसारे मॅडम, श्रीमती गुत्तेदार मॅडम, श्रीमती कोकाटे मॅडम यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे आभार देशमुख सर यांनी मांडले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला