August 9, 2025

कार्यकर्त्यांच्या पुरस्कारामुळे मला प्रेरणा मिळाली – अँड.वर्षा खोडसे-भिसे

  • लातूर – ज्योती सारखे काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना महात्मा फुले समाज रत्न पुरस्कार माझ्या हस्ते दिल्यामुळे मी भारावून गेले असून सामाजिक कार्यांत झोकून देण्यासाठी मला प्रेरणा मिळाली असल्याचे हृदयस्पर्शी उद्गार जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथील विधी अधिकारी अँड.वर्षा खोडसे-भीसे यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात काढले.
    महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी पत्रकार भवन लातूर येथे संस्था अध्यक्ष अनिसखान पठ्ठाण यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार -२०२३ हा वितरण सोहळा मोठ्या दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला.
  • या कार्यक्रमात माजी नगरसेविका छाया शिंदे,संस्थेच्या मराठवाडा अध्यक्षा उषा धावारे,सिद्धार्थ कवठेकर,अच्युत माने,डॉ.खाजा शेख, जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी अधिकारी अँड.वर्षा खोडसे-भिसे आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले समाज रत्न पुरस्कार, प्रमाणपत्र,ट्राफी,शाल,पुणेरी पगडी आणि पुष्पहार आणि पुष्पहाराने श्रीमती सुवर्णा घुले,श्रीमती बालिका गाडेकर,सा.साक्षी पावनज्योत संपादक सुभाष घोडके,विशेष प्रतिनिधी राजाभाऊ बारगुले,शिराढोण प्रतिनिधी परमेश्वर खडबडे,पत्रकार संभाजी गिड्डे,भारत जोशी,अनंतराव घोगरे,ज्ञानेश्वर पंडागळे,दिलीप शितोळे,विजयानंद मडके,सतीश कांबळे,बालाजी मडके,दिलीप पाटील,सोमनाथ कसबे,सूर्यकांत सुरे,नबिलाल शेख, परमेश्वर कसबे,वैभव ताटे आदि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले.
  • यावेळी भारत जोशी,परमेश्वर कसबे आदींनी मनोगत व्यक्त केले.
  • या कार्यक्रमाचे आभार व भारदस्त असे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव सुफी सय्यद शमशोद्दिन यांनी केले. हा सत्कार समारंभ यशस्वी करण्यासाठी सतीश गायकवाड,सुनील भिसे, इलाही शेख,रुक्मिणी जाधव,आतिक फारोखी, उद्धव जाधव,संभाजी मांदळे,कय्यूम सय्यद,पंकज गायकवाड, प्रशांत धावारे,संजयकुमार आडे, विष्णू कदम,बिरु कुकर,अमजद मणियार,बालाजी घोडके,मंजित मांदळे, सिद्धार्थ कवठेकर आदींनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!