June 25, 2025

अर्ज करताना रेशनकार्डची प्रत काढण्यासाठी कार्यपद्धतीचा अवलंब करा – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

  • धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यात नगरपालिका,नगरपंचायत, ग्रामपंचायत व सेतू सुविधा केंद्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र महिला लाभार्थ्यांकडून ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात सुरू आहे.
  • या योजनेचा अर्ज ऑनलाईन ऑफलाइन भरण्याकरिता अर्जदार यांना त्यांचे शिधापत्रिका प्रत अर्जासोबत सादर करण्यासाठी येणारी अडचण विचारात घेता अर्जदारांनी त्यांची शिधापत्रिकाची प्रत मिळण्यासाठी तसेच आपल्या गावची शिधापत्रिकाची यादी मिळवण्यासाठी पुढील कार्यपद्धतीचा अवलंब करावा.
  • अर्जदाराने रेशन कार्डचा 12 अंकी क्रमांक आपल्याला माहीत नसल्यास त्यानुसार रेशन कार्डचा 12 अंकी क्रमांक प्राप्त करावा.https://rcms.mahafood.gov.in/Show_Reports.aspx.aspx?RID=98 या लिंकवर जाऊन आपल्या गावाची यादी पीडीएफ किंवा एक्सेल फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करावी. वरील लिंकवर क्लिक केल्यावर captcha टाकून घ्यावा. त्यानंतर आपले राज्य निवडावे, नंतर जिल्हा निवडावा. सर्व योजना निवडून सबमिट करावा.
  • आपल्यासमोर संपूर्ण जिल्ह्याचा डेटा येईल.DSO Dharashiv वर क्लिक करावे. त्यानंतर सर्व तालुक्यांचा डेटा येईल.आपल्या तालुक्यावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्या गावाच्या नावावर क्लिक करावे. आपल्याला आपल्या गावातील सर्व योजनांची व लाभार्थ्यांची यादी मिळेल. ही यादी पीडीएफ किंवा एक्सेल फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करून घ्यावी. त्यामध्ये आपले नाव व रेशन कार्डचा 12 अंकी क्रमांक पहावा.त्यानंतर पुढील कार्यपद्धतीचा अवलंब करावा. अर्जदाराने आपल्या रेशन कार्डचा 12 अंकी क्रमांक आपल्याला माहीत असल्यास खालील पद्धती वापरावी. वैयक्तिक शिधापत्रिका डाउनलोड करण्याची पद्धत.सर्वांनी https://rcms.mahafood.gov.in/Show_Reports.aspx?RID=116 या लिंकवर क्लिक करून Captcha टाकून घ्यावा. त्यानंतर आपला 12 अंकी रेशन कार्ड नंबर टाकावा.त्यानंतर Print Ration Card या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आपले कुटुंबाचे रेशन कार्ड दिसेल ते आपण प्रिंट काढून घ्यावे व या योजनेच्या अर्जासोबत जोडून अर्ज सादर करावा.
  • तरी जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र ठरू शकणाऱ्या शहरी व ग्रामीण भागातील महिलांनी या योजनेच्या अर्जासोबत शिधापत्रिकेची प्रत जोडण्यासाठी वरील नमूद कार्यपद्धतीचा अवलंब करावा.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी केले आहे.
error: Content is protected !!