June 23, 2025

लिटल किंग्जच्या वृक्ष दिंडीने वसमतकर विठ्ठल भक्तीत तल्लीन

  • वसमत – शहरातील शिक्षण, संस्कार,ज्ञान,विज्ञान आणि अध्यात्माची जोड घेऊन लहान मुलांमधे संस्कार वृक्ष दिंडीचा न नीमित्ताने मागील आठरा वर्षा पासून शहरातून आषाढी एकादशी निमित्त वृक्ष दिंडीचा अभिनव प्रयोग करून नागरिकांमध्ये झाडे लावून ती जगविण्यासाठी विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि ज्ञानोबा तुकोबाचे निसर्ग विषयक तत्वज्ञान शहरातून वृक्ष दिंडीचा अभिनव उपक्रक वसमत येथील लिटल किंग्ज शाळेच्या वतीने राबविण्यात आला.
    शाळेतील जवळपास दीडशे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या दिंडीत सहभागी झाले होते.
    विठ्ठल – रखुमाई संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर,संत जनाबाई,संत शेख महमद, ई संताच्या भुमिका यावेळी विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या.
    टाळ,चिपळ्या,मृदंग,झाडांची महती सांगणारी अभंग,पालखीत संत तुकाराम महाराज पुतळा आणि झाड घेऊन वाजत गाजत जणू वसमत शहरात जणू पंढरीच आवतरली होती.या वृक्षदिंडीचे वसमत शहरात अनेक नागरिकांनी जोरदार स्वागत केले.
    शेकडो विद्यार्थ्यांच्या हातात झाडांचे संवर्धन आणि संरक्षण व महत्व सांगणारे फ्लग होते.
    विठ्ठलाची भूमिका ईयत्ता आठवितील विद्यार्थी सचिन सोळंके तर रुकमाई ची भुमिका इयत्ता सातवीतली विद्यार्थीनी कु. सृष्टी दळवी हिने केली.तुकाराम महाराज यांची भुमिका क्षितिज कदम,संत जनाबाई भुमिका मानसी उदावंत,
    तर संत मुक्ताई ची भुमिका कु. सृती इंगोले हिने केली.
  • @वृक्ष दिंडीने दिला झाडं लावून ती जागविण्याचा संदेश
    मागील अनेक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळा जाणवला. पावसाळ्यात पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचे कारण मोठ्या प्रमाणावर झाडांच्या कत्तली झाल्या आहेत.
    त्यासाठी पुन्हा निसर्गाने आपले रूद्र रूप दाखविण्यात आधी मानवाने सावध व्हावे आणि झाडं लावून ती जागविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नसता पृथ्वीचा नायनाट व्हायला वेळ लागणार नाही.
    म्हणून आमच्या शाळेत मुलांना झाडे लावण्याचा संस्कार त्यांच्या मनात रोज जावा म्हणून मागील आठरा वर्षापासून वसमत शहरात वृक्ष दिंडी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आम्ही काढीत असतो.

    — प्रा.डॉ.नामदेव दळवी
    संस्थापक लिट्ल किंग्ज स्कूल, वसमत.

error: Content is protected !!