September 21, 2026

लाडका भाऊ योजनेचे कळंब शिवसेनेकडून जल्लोषात स्वागत

  • कळंब – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बेरोजगार तरुणांसाठी लाडका भाऊ योजना जाहीर केली. यामुळे बेरोजगार युवकांना मोठा आधार मिळणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने पाठोपाठ लाडका भाऊ योजना जाहीर केल्यामुळे महाराष्ट्रातील समस्त महिला वर्गाबरोबर युवकांत ही चैतन्य पसरले आहे.
    या योजनेचे स्वागत व मुख्यमंत्री व महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करण्यासाठी कळंब शहरातील शिवसेना व युवासेना चे कार्यकर्त्यांनी धाराशिव जिल्हा शिवसेना निरीक्षक नितीनदादा लांडगे यांच्या उपस्थितीत जल्लोष केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व फटाके फोडून तसेच उपस्थितांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री व पालकमंत्री व महाराष्ट्र शासनाच्या घोषणा देत कृतज्ञता व्यक्त केली.
  • यावेळी नितीन लांडगे,माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा,सुधीर भवर, शहरप्रमुख गजानन चोंदे, सागर मुंडे,मंदार मुळीक, लक्ष्मीकांत हुलजूते, ईश्वर शिंदे, कृष्णा हुरगट, बाबुराव शेंडगे, डॉ गोविंद जोगदंड, सचीन सौलाखे, महेश पुरी, शंकर वाघमारे,शकील काझी, सिध्देश्वर शिंगणापूरे, अमर गायकवाड, संघर्ष कांबळे, नंदुदादा हौसलमल, शक्ती नलवडे, धम्मपाल विद्यागर, सोमा वावरे, सनी बोरगे, विष्णू कोळपे, प्रमोद करवलकर, इम्रान सय्यद, अकमल काझी, नियामत पठाण, राजेश गोरे, इत्यादी अनेक जण उपस्थित होते.
error: Content is protected !!