August 9, 2025

ज्ञान प्रसार विद्यालयात वृक्षारोपण करून वृक्ष दिंडीचे आयोजन

  • मोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१६ जुलै २०२४ रोजी ज्ञान प्रसार विद्यालय मोहा येथे प्राथमिक प्रशालेत आषाढी एकादशीचे औचित्य साधून वृक्षारोपण करून वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी वारकरी वेशभूषेत अनेक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फुर्त सहभाग घेतला.या कार्यक्रमाच्या प्रसंगी सहशिक्षक शेवाळे कमलाकर, सोलनकर शहाजी,श्रीमती.पांचाळ उषा , श्रीमती.सोनवने निता,जाधव मामा तसेच प्रशालेतील विद्यार्थी , विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते .
error: Content is protected !!