पुणे – स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र शासनामार्फत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक ३० ऑक्टोबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार सर्वकष धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने बार्टी, पुणे मार्फत सन २०२४-२५ करिता संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या (नागरी सेवा) दिल्ली व महाराष्ट्र करिता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा (राजपत्रित), न्यायिक सेवा, अभियांत्रिकी सेवा, पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण तसेच बैंक (IBPS) रेल्वे, एल.आय.सी या व इतर तत्सम स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणाकरीता राज्यभरातून उमेदवार ऑनलाईन अर्ज सादर करत आहेत परंतु सर्व मान्यता प्राप्त विद्यापीठांच्या तृतीय आणि चतुर्थ वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण पात्र ठरवत नसल्याची बाब समोर येत आहे ही बाब अतिशय चुकीची असून ती तात्काळ मागे घेण्यात यावी व सर्व मान्यताप्राप्त विद्यापीठ विद्यापीठांच्या सर्व शाखेचे विद्यार्थी यांचे तृतीय व चतुर्थ शेवट वर्षाचे प्रमाणपत्र अजून विद्यापीठाकडून मिळालेले नसल्याने त्याची अर्ज करण्याची तारीख ही वाढवून १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत करण्यात यावी. व चालू उत्तीर्ण प्रमाणपत्रावर त्यांना पात्र ठरविण्यात यावे. सदर निवेदनावर गांभीर्याने विचार करून आपल्या बार्टी प्रशासनाकडून योग्य ती पावले उचलली न केल्यास राज्यभरात समाज कल्याण आयुक्त कार्यालयासमोर निदर्शनासह आंदोलन करण्यात येईल याची नोंद भारती प्रशासनाने घ्यावी. दरम्यान झालेल्या कायदा व सुव्यवस्थेची सर्व जबाबदारी पार्टी प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी अशा मागणीचे निवेदन सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर निरीक्षक अक्षय गोटेगावकरयांनी बार्टी प्रशासनाकडे केली आहे.
More Stories
“कामगार चळवळीचा कणखर आधारवड हरपला” — अच्युतराव माने पाटील यांचे निधन
व्यावसायिक गणेश घेवारे यांना मातृशोक
भगवंताचे गुण संतांमध्ये दिसतात – ह.भ.प.अच्युत आंबीरकर महाराज