कळंब – बीड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे हे लोकसभा अधिवेशनास उपस्थित राहून व खासदार पदाची शपथ घेऊन बीड लोकसभा मतदारसंघ (केज ) येथे कळंब मार्गे जात असताना दिनांक ८ जुलै रोजी कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रियदर्शनी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक कळंब येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष व प्रियदर्शनी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन प्रा.श्रीधर भवर व रमेश देशमुख,भीमा हगारे, तसेच महिला आघाडीच्या वतीने सुनंदा भोसले,प्रा.मीनाक्षी भवर, शोभा मस्के यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत केले याप्रसंगी फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. खासदार बजरंग सोनवणे हे कळंब येथील भवर कुटुंबीयांचे जावई आहेत. स्वागतासाठी कार्यकर्त्यांची व नागरिकांची मोठी गर्दी होती.
More Stories
निरोगी गावाकडे वाटचाल;मौजे बोरफडी येथे ‘अनिमिया मुक्त गाव’ उपक्रमाचा भव्य शुभारंभ
ग्रामोदय समितीच्या संचालकपदी उद्योजक गुंडू पवार यांची एकमताने निवड
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात अभिवादन