August 9, 2025

विधानसभेत ‘इंडिया’ला भारत जोडोचे समर्थन

  • वर्धा (प्रत्युष बाबा ) – महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवाराला भारत जोडो अभियान समर्थन देणार, असा निर्णय सेवाग्राममध्ये झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात घेण्यात आला. संविधान वाचविण्याच्या बाजूने हे अभियान असल्याचे मतही मांडण्यात आले.
    सेवाग्राममधील यात्री निवास परिसरात भारत जोडो यात्रेच्या सदस्यांचे दोन दिवस मंथन झाले.
    राष्ट्रीय समन्वयक योगेंद्र यादव, तुषार गांधी व भारत जोडो अभियानाचे २५० सदस्य या अधिवेशनात सहभागी झाले होते. मंगळवारच्या सत्रात पाच गट तयार करण्यात आले. या गटांमध्ये चर्चा घडवून आणण्यात आली. निधी उभारणी, सोशल मीडिया, संघटन, जनआंदोलन आणि राजकीय समन्वय साधण्यासाठी विविध चमूही तयार करण्यात आल्या. त्यानुसार जबाबदारीचे वितरणदेखील करण्यात आले.लोकसभा निवडणुकीत भारत जोडो अभियानाचा संविधान वाचवाचा मुद्दा प्रभावी ठरला.
    याच पद्धतीचा फायदा विधानसभा निवडणुकीत व्हावा म्हणून तळागावात पोहचून अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य माणसाची भूमिका ही अधिक महत्वाची असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले.
  • # उल्का महाजन यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी
  • भारत जोडो अभियानच्या पदाधिकाऱ्यांची निवड अधिवेशनात करण्यात आली. यात उल्का महाजन यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राष्ट्रीय समन्वयक म्हणून कविता कुरघंटी, महासचिव भारत झा काम करणार आहेत. याशिवाय विविध राज्यात समन्वयकही निवडले गेले आहेत.
  • # लोकसभेत भाजपला ७८ जागांवर फटका !
  • तब्बल १५६ लोकसभा मतदारसंघांत भारत जोडो अभियान इंडिया आघाडीच्या समर्थनात उभे राहिले. ७८ जागांवर भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भारत जोडो अभियानाची महत्वाची भूमिका राहिली, असा दावा भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक योगेंद्र यादव यांनी केला. सेवाग्राममधील राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपानंतर गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तुषार गांधी म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात पसरलेली घाण स्वच्छ करायची आहे. ‘डबल इंजिन’ सरकार म्हणणाऱ्यांकडून हे होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
error: Content is protected !!