February 9, 2026

वारीसाठी पायी निघालेल्या दिंड्यासाठी कळंब नगर परिषदे कडून विविध सोयी सुविधा

  • कळंब ( माधवसिंग राजपूत ) – आषाढी,एकादशीसाठी विदर्भ तसेच मराठवाड्यातील पूर्वेकडील भागातील हजारो वारकरी पायी दिंडीतून शेकडो किलोमीटर पायी मार्गक्रमण करीत असतात. ही प्रथा इसवी सन तेराव्या शतकापासून असल्याचा उल्लेख आढळतो कळंब शहरात मुक्कामी दिंड्या थांबतात दिंडीतील वारकऱ्यांची चहा, नाश्ता व भोजनाची सोय शहरातील भक्ताकडून केली जात त्या कामात समाजसेवी संघटना देखील पुढाकार घेत आहेत यामुळे शहरातील वातावरण भक्तीमय आहे शहरात मुक्कामी असणाऱ्या व पुढे जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना सोयी सुविधा देण्यासाठी
    कळंब नगर परिषदेचे नूतन मुख्याधिकारी गोपाल तापडिया यांनी यावर्षी एक अनोखी कल्पना आखून सत्यात उतरवली.
    वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय, मोबाइल टॉयलेट आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देणे, आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका तयार ठेवणे, दिंडीचा मार्गावर कचरा उचलण्यासाठी दोन घंटा गाडी तसेच ट्रॅक्टर उभा करणे, दिंड्या ज्याठिकाणी उतरतात त्याठिकाणी अग्निशामक वाहन सुसज्ज स्थितीत ठेवणे, शुद्ध पिण्याचे पाणी पुरवणे अशा विविध सुविधा पालिकेतील ज्या कर्मचाऱ्यांकडे सोपविला आहेत, त्यांचे भ्रमणध्वनी संपर्क क्रमांक असलेले होर्डिंग शहरातील प्रमुख रस्त्यावर निदर्शनास येतील अशा रीतीने लावण्यात आले आहेत या उपक्रमाबद्दल शहरातील नागरिक नगरपरिषद यंत्रणेचे कौतुक करीत आहेत या कामी मुख्याधिकारी गोपाल तापडिया ,कार्यालयीन अधीक्षक एक.एस.वाघमारे, स्वच्छता संजय हाजगुडे, आरोग्य विभागाचे कल्याण गायकवाड, शामराव वाघमारे, गोविंद रणदिवे, अग्निशामक दलाचे संजय काळे, नितीन गायकवाड, सुगत वाघमारे,संतोष गोरे यांच्या वतीने शुद्ध पाणी जल व त्यांची टीम यांच्यासह पालिकेतील कर्मचारी ह्या कामासाठी कष्ट घेत आहेत.

    आषाढी वारीच्या निमित्ताने कळंब शहरातून मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांची नगरपरिषद कर्मचारी मोठ्या आनंदाने सेवा करीत आहेत ही सेवा
    पांडुरंगाच्या चरणी अर्पण केल्यासमाखी आहे. – गोपाल तापडिया (मुख्याधिकारी, नगर पालिका कळंब)

error: Content is protected !!