कळंब – शासकीय नौकरी असो वा सामाजिक कार्य असो सी.आर.घाडगे यांनी वयाच्या ७५ वर्षापर्यंत तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध धम्मातील पंचशीलाचे पालन करून सर्वसमावेशक निस्वार्थी सेवा केली असे प्रतिपादन पूज्य भन्ते सारिपुत्त यांनी केले.
कळंब येथील जिल्हा परिषद प्रशालेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सी.आर.घाडगे यांचा कौटुंबिक व समाजातील विविध क्षेत्रातील तसेच सामाजिक संघटनांनी एकत्र येत त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा सत्कार समारंभ रविवार दि.०७ जुलै २०२४ रोजी आयोजित करण्यात आला.
पूज्य “भंते सारीपुत्त”सोलापूर यांनी वंदना,त्रिसरण,पंचशील देऊन धम्म प्रवचनातून सामाजिक उदबोधन केले आणि घाडगे सरांचे अभिष्टचिंतन केले. येरमाळा रोड वरील हासेगाव केज येथील हॉटेल तारा फंक्शन हॉल मध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमात अनेक समाज उपयोगी आठवणी उपस्थित मान्यवरांनी सांगितल्या व त्यामध्ये त्यांनी आज तागायत सातत्य कसे ठेवले याविषयी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या विद्यार्थी दशेतील महाविद्यालय प्रतिनिधी सी.आर ते समाज प्रतिनिधी सी.आर.असा प्रवास उलगडण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.के. कुलकर्णी, मुख्याध्यापक संघाचे सुरेश टेकाळे,ह.भ.प महादेव महाराज अडसूळ,देवळालीचे प्रतिष्ठित नागरिक रोहिले बाप्पा,ज्येष्ठ साहित्यिक के.व्ही.सरवदे, सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष गायकवाड, मारुती गायकवाड, माजी उपप्राचार्य डॉ. शंकर कांबळे,मिलिंद गायकवाड, डॉ. बबन कांबळे,मुख्याध्यापक संतोष भोजने,बाबासाहेब उबाळे, जोशाबा पतसंस्थेचे माजी संचालक सी.बी.आल्टे, संजय धावारे,शरद धावारे,राजू धावारे,शांताबाई धावारे,हिराचंद माळी,ज्येष्ठ नागरिक बी.एन. शीलवंत, वंचित बहुजन आघाडीचे अनिल हजारे, माजी मुख्याध्यापक सुलभा कुलकर्णी, पत्नी वत्सलाताई घाडगे,मुले रंजन, केतन,मुली स्वाती,प्रांजली, जावई सुरेश धावारे, बाळासाहेब वाघमारे,सुना,नातवंडे असा परिवार उपस्थित होता.
तत्पूर्वी त्यांच्या निवासस्थानी सकाळ प्रहरी आमदार कैलास पाटील,सिनेट सदस्य प्रा.डॉ. संजय कांबळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे व इतर मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्तींनी ७५ वर्षातील कडू गोड आठवणींचा व संघर्षाचा उलगडा केला. संघटनात्मक व प्रशासकीय अनुभव खूप असल्याने सुमारे ३० वर्षांपूर्वी रोहिले बप्पा व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याआमदारकी साठी तालुक्यातील ९५ गावांच्या ग्रामपंचायतीचे ठराव घेतलेले होते. त्याच बळावर काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाने तिकीट देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु नोकरीमुळे आपण हा निर्णय घेतला नाही ही आठवण कथन करून यापुढेही आपण सामाजिक हित जपण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्याभवन हायस्कूलच्याशिक्षिका असलेल्या त्यांच्या कन्या स्वाती धावारे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार प्रमुख लक्ष्मण धावारे यांनी केले तर आभार प्रदर्शन जो. शा.बा.शिक्षक पतसंस्थेचे सचिव महेंद्र रणदिवे यांनी केले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात