कळंब – तालुक्यातील कन्हेरवाडी येथे शनिवार दिनांक ०६ जुलै २०२४ रोजी डेंग्यू रुग्ण आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे.लागलिच ग्रा.प. कार्यालयाच्या वतीने सरपंच ॲड रामराजे जाधव,ग्रामसेवक प्रभाकर बोंदर आणि उपसरपंच व सर्व सदस्य तसेच ग्रा.प.चे कर्मचारी रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून गावात फवारणी करण्याच्यादृष्टीने सुरुवात करुन फवारणी करण्याचे काम दिवसभर चालू होते तर आरोग्य पथक उशिरा सकाळी अकरा ते बारा वाजता दाखल होताच अंगणवाडी सेविका,मदतनीस यांनी गावात घरोघरी जाऊन आयबिट करुन ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत होते. सविस्तर माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून नागरिक थंडी,ताप,सर्दि,खोकला,अंगदुखी या सारख्या आजाराने त्रस्त झाले होते.यातच शनिवारी दिनांक ०६ जुलै रोजी डेंग्युचे चार रुग्ण आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे. त्यामुळे सरपंच ॲड. रामराजे जाधव आणि ग्रामसेवक प्रभाकर बोंदर व इतर सर्व ग्रा.प सदस्य यांनी रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून गावात फवारणी करण्यास सुरुवात केली होती.त्यामुळे सरपंच,ग्रामसेवक,ग्रा.प सदस्य,ग्रा.प कर्मचारी,अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे कौतुक केले जात आहे तर दुसरीकडे आरोग्य विभागाचे कर्मचारी गावात उशिरा दाखल झाल्यामुळे ग्रामस्था कडुन नाराजीचा सूर ऐकावास मिळत होता.यापुढे तरी आरोग्य विभागाकडून तात्काळ उपाययोजना करुन घरोघरी भेटी देऊन नागरीकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे ग्रमस्थामधुन बोलले जात आहे.कन्हेरवाडी गावांमध्ये काही दिवसांपासून सर्दि,खोकला,ताप,अंगदुखी या आजाराने त्रस्त झाले आहेत. डाॅक्टरकडे गेल्यानंतर डेंग्युचे लक्षण दिसून येत आहेत. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा पण समावेश दिसून येत आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत असल्यामुळे गावात ग्रा.प कार्यालयाच्या वतीने सरपंच ॲड रामराजे जाधव,उपसरपंच विजय उर्फ सोनू कवडे,ग्रामसेवक प्रभाकर बोंदर,ग्रा.प.चे सर्व सदस्य,पत्रकार रामराजे जगताप,ग्रा.प सदस्य उदय मोरे,ग्रा.प कर्मचारी नाना खंडागळे,प्रणील कवडे,लक्ष्मण ना.जाधव,प्रदिप खंडागळे,सुरेश जगताप,महादेव सुरवशे ग्रा.प सदस्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
*आपल्या गावात चार रुग्ण डेंग्यू दृष्य आजाराने त्रस्त असुन प्रायमरी रिपोर्ट पाॅझीटिव्ह आलेले आहेत तरी नागरीकांनी घाबरुन न जाता सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे सध्या सि ईओ ,जिल्हा आरोग्य अधिकारी आणि बिडिओ यांच्याशी बोलने झाले आहे.आज आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले आहे तरी आजारी व्यक्ती आणि कुटुंबातील सदस्यांनी तपासणी करून घ्यावी तसेच गावात,वस्तीवर धुळ फवारणी चालू करण्यात आली आहे तसेच गावातील पडिक जागेत व इतर जागेवर तणनाशकची फवारणी करण्यात येणार आहे तसेच या पुढे योग्य त्या उपाययोजना केल्या जातीलच पण नागरीकांनी देखील घरातील सांडपाणी,साठवणुकिची भांडी,बॅलर,रांजण अबेट करुन घेऊन ग्रा.प कार्यालयाला सहकार्य करावे तसेच डास वाढुनये यासाठी सर्वांनी स्वछता राखावी – ॲड.रामराजे नागोराव जाधव. – सरपंच – ग्रामपंचायत कण्हेरवाडी
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले