शिराढोण (आकाश पवार ) – शिराढोण व कळंब तालुक्यातील सर्व ऑनलाईन सेंटर धारकांनी दि.८ जुलै २०२४ रोजी आपल्या कामकाजाचा बंद पुकारला आहे. सर्व CSC चालकांनी शासनाच्या नवीन जीआरच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्याचे ठरविले आहे. या बंदचे मुख्य कारण म्हणजे शासनाने नवीन जीआर जारी करताना CSC सेंटर धारकांना कोणतेही कमीशन न देता फुकट काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. CSC चालकांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, “आम्ही फुकट काम का करावे? आम्हाला आमच्या कष्टांचे योग्य कमीशन मिळाले पाहिजे. कमीशन फी प्रत्येक महिन्यात अकाउंटला जमा करा किंवा प्रत्येक महिन्याला २०,००० रुपये मानधन देण्यात यावे.” CSC चालकांच्या मते, कमीशनच्या नावाखाली त्यांची वारंवार फसवणूक होत आहे आणि त्यांना त्यांचे हक्काचे मोबदला मिळण्याची मागणी आहे. या आंदोलनात CSC चालकांनी आपल्या मागण्यांचा जोरदार पाठिंबा दर्शविला आहे. त्यांना आपल्या कष्टांचे योग्य मोबदला मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. या आंदोलनामुळे शिराढोण व कळंब तालुक्यातील सर्व ऑनलाईन सेतु केंद्र व CSC चालकांचे काम बंद राहणार आहे.
More Stories
निरोगी गावाकडे वाटचाल;मौजे बोरफडी येथे ‘अनिमिया मुक्त गाव’ उपक्रमाचा भव्य शुभारंभ
ग्रामोदय समितीच्या संचालकपदी उद्योजक गुंडू पवार यांची एकमताने निवड
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात अभिवादन