कळंब – नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 गुणवत्तापूर्वक शिक्षण देणारी शाळा असल्याने शहरातील विविध सामाजिक संघटनेमार्फत मदतीचा ओघ सुरू आहे असे असे उद्गार माजी नगराध्यक्ष यशवंत दशरथ प्रभाकर कुलकर्णी यांच्या वतीने शाळेला साऊंड सिस्टिम भेट देण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना काढले त्यांनी याप्रसंगी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये गुणवत्ता यादी स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात येतील असे जाहीर केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापीका श्रीमती पायाळ आर.एस. तर प्रमुख अतिथी म्हणून कळंब नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष यशवंत दशरथ तसेच प्रभाकर कुलकर्णी,मनोज जोशी, मुनाफ शेख हे उपस्थित होते. यापूर्वी आम्ही कळंबकर ग्रुपच्या वतीने शाळेतील सर्व मुलांना मोफत दप्तर व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले होते. तसेच दहावीची 1971 च्या बॅचच्या वतीने वह्याचे वाटप करण्यात आले होते. आणि आज प्रभाकर कुलकर्णी यांच्या वतीने साउंड सिस्टीम भेट देत मदतीचा ओघ सुरूच ठेवला आहे. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीमती पायाळ आर. एस. यांनी मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश खरडकर तर आभार प्रदीप सर्जे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप सर्जे ,दशरथ नथाडे, संतोष पवळ, नारायण बा, पठाण वाय.डब्ल्यू. श्रीमती झाडे एम. एम.,सुदामती गरड आदींनी परिश्रम घेतले.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन