लातूर – महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, लातूर येथे अकरावी कला,वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा तासिका प्रारंभ दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचा महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई यांच्या हस्ते पुष्पहार तर विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ आणि पेढे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य प्रा.संजय पवार,पर्यवेक्षक प्रा.शिवशरण हावळे,बोर्ड समन्वयक डॉ. गुणवंत बिरादार,नीट/जेईई/सीईटी समन्वयक प्रा.वनिता पाटील,समन्वयक प्रा.गिराम कल्पना,प्रा.स्वामी विश्वनाथ, प्रा. सोनोने रविंद्र. डॉ. घनश्याम ताडेवार, प्रा.रवींद्र सुरवसे, डॉ. अश्विनी रोडे, प्रा. वैशाली जयशेट्टे, प्रा. दीपक बजाज, प्रा. शैलेश कानडे, प्रा. नागेश सुगरे, प्रा. परमेश्वर पाटील, प्रा. कामाजी पवार, प्रा. महादेवी पटणे प्रा. शुभांगी खुब्बा, प्रा. मीनाक्षी नीला, प्रा. सरस्वती बोरगावकर, प्रा. शितल झुंजे, कार्यालयीन प्रमुख नामदेव आणि पालक यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, उपप्राचार्य प्रा. संजय पवार आणि पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजाभाऊ बोडके, शुभम बिरादार, जगन्नाथ येचेवाड, संतोष राठोड, अनिता धनवडे, इम्तियाज शेख,अशोक शिंदे यांनी परिश्रम घेतले.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश