धाराशिव (जिमाका) – केंद्र सरकारच्या नीती आयोगाने आकांक्षीत जिल्हा व तालुका कार्यक्रमांतर्गत देशातील 112 जिल्ह्यांची व 500 तालुक्यांची आकांक्षीत तालुले म्हणून निवड केली आहे.त्यापैकी 112 जिल्ह्यांपैकी राज्यातील धाराशिव जिल्ह्याची आकांक्षीत जिल्हा म्हणून तर परंडा तालुक्याची आकांक्षीत तालुका म्हणून निवड केली आहे. या कार्यक्रमांतर्गत निश्चित केलेल्या क्षेत्रातील निर्देशांकांमध्ये वृद्धी होण्यासाठी जिल्ह्यात विविध योजना/कार्यक्रम व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत जिल्ह्यात संपूर्णता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ कार्यक्रम 4 जुलै ते 6 जुलै या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.या अभियानाची रूपरेषा ठरविण्यासाठी 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.यामध्ये या अभियानांतर्गत जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील सहा निर्देशांक 100 टक्के संतृप्त करण्याचे निश्चित केले आहे. जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी 6 निर्देशांक निश्चित केले आहे. जिल्ह्यातील परंडा तालुकयाचे मागासलेपण ओळखूनआकांक्षीत तालुका म्हणून निवड केली आहे. धाराशिव जिल्ह्याकरीता ६ निर्देशांक निश्चित केले आहे.यामध्ये १) नोंदणी केलेल्या गर्भवती महिलांची टक्केवारी पहिल्या तिमाहीत जन्मपूर्व काळजी (ANC).2)एकात्मिक बाल विकास कार्यक्रमांतर्गत नियमितपणे पूरक पोषण आहार घेणाऱ्या गर्भवती महिलांची टक्केवारी,3) मृदा आरोग्य पत्रिकांची वितरित संख्या,4) पूर्ण लसीकरण झालेल्या मुलांची टक्केवारी (9-11 महिने) यामध्ये (BCG+DPT3+OPV3+गोवर 1)
5) माध्यमिक स्तरावर विद्युत सुविधा असलेल्या शाळांची टक्केवारी आणि 6) शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून 1 महिन्याच्या आत मुलांना पाठ्यपुस्तके पुरवणाऱ्या शाळांची टक्केवारी असे निर्देशांक निश्चित केले आहे. परंडा तालूकाकरीता 6 निर्देशांक निश्चित केले आहे.याध्ये 1) पहिल्या तिमाहीत जन्मपूर्व काळजी (ANC) साठी नोंदणीकृत गर्भवती महिलांची टक्केवारी.2) ब्लॉकमधील लक्ष्यित लोकसंख्येच्या तुलनेत मधुमेहासाठी तपासणी केलेल्या व्यक्तीची टक्केवारी.3) ब्लॉकमधील लक्ष्यित लोकसंख्येच्या तुलनेत उच्च रक्तदाबासाठी तपासणी केलेल्या व्यक्तीची टक्केवारी.4) एकात्मिक बाल विकास कार्यक्रमांतर्गत नियमितपणे पूरक पोषण आहार घेणाऱ्या गर्भवती महिलांची टक्केवारी.5) माती नमुना संकलनाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत तयार केलेल्या मृदा आरोग्य कार्डांची टक्केवारी.6) ब्लॉकमधील एकूण बचत गटांच्या तुलनेत फिरता निधी मिळालेल्या बचत गटांची टक्केवारी. असे 6 निर्देशांक परंडा तालुक्यासाठी निश्चित केले आहे. वरील जिल्हास्तर आणि तालुकास्तर निर्देशांक तीन महिन्यामध्ये 100 टक्के संतृप्त करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांनी बैठकीमध्ये संबंधित यंत्रणांना निर्देश दिले.या अभियानांतर्गत दर 15 दिवसानी प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. संपूर्णता अभियान राबविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या अभियानाचा उद्घाटन समारंभ परंडा येथे 4 जुलै रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांनी सांगितले.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश