कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात प्रतीवर्षीप्रमाणे दि.१ जुलै २०२४ रोजी रासेयो विभागाच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांची १११ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त डॉ.अशोकराव मोहेकर ( सचिव ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा ) यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. वसंतराव नाईक यांचे सामाजिक कार्य यावर प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी (सांस्कृतिक विभागप्रमुख ) यांनी व्याख्यान दिले. यावेळी ते म्हणाले, ” महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन करण्यात आले. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, शेतीविषयक आणि महिलाविषयक अशा सर्वच क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. उपेक्षितांच्या स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय, बंधुता आणि उपेक्षितांच्या हक्कासाठी लढा दिला, त्यांचे विचार नेहमीच प्रेरणा देतात.आपल्या देशाला महापुरूषांच्या समृद्ध, परंपराचा वारसा आहे, तो जपणे आपले कर्तव्य आहे,” असे मत सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी मांडले. यावेळी प्राचार्य डॉ. सुनील पवार, उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान, डॉ. ईश्वर राठोड, डॉ. डी.एन.चिंत्ते, प्रा.पंडित पवार, डॉ.नामानंद साठे, प्रा.दादाराव गुंडरे,प्रा. डॉ.के.डब्लू.पावडे, प्रा डॉ महाजन,प्रा. मिनाक्षी जाधव. प्रा. विलास आडसुळ,प्रा. एन. एम. अंकुशराव, प्रा. आप्पा मिटकरी, डॉ. डी. एन. चिंते,प्रा. वसंत मडके, प्रा.डॉ.सुरेश वेदपाठक, प्रा.जयंत भोसले,प्रा.श्रीकांत भोसले, प्रा. गणेश आडे, श्री नेताजी देशमुख, जीवन वाघमारे, अधीक्षक हनुमंत जाधव, अरविंद शिंदे, श्री प्रकाश शिंदे, इकबाल शेख, अमोल सुरवसे, आदित्य मडके, भारत शेळके आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. नामांनंद साठे यांनी सूत्रसंचलन तर उपस्थितांचे आभार रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.आर.व्ही. ताटीपामूल यांनी मानले. या कार्यक्रमासाठी संदीप सूर्यवंशी, अर्जुन वाघमारे आणि कमलाकर बंडगर यांनी परिश्रम घेतले.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश