लातूर (दिलीप आदमाने ) – शिक्षण हा आत्मउन्नतीचा मार्ग आहे. शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो. किंबहुना समाज व देशाची प्रगती होते. अध्ययन व अध्यापनाचा स्तर हा उच्च आणि प्रामाणिक असणे आवश्यक आहे. देशातील विध्यार्थ्यांनी शिक्षण घेताना स्व:कल्याणा सोबत देश विकासाचा दृष्टीने शिक्षण घ्यावे असे प्रतिपादन पू. भिक्खू पय्यानंद थेरो यांनी केले आहे. बौध्द धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट, रानेगऑन व प्रज्ञा महिला मंडळ, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जेष्ठ पौर्णिमा, धम्मदेशना व गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन नालंदा बुध्द विहार, प्रकाश नगर, लातूर येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भिक्खू संघ व उपस्थितीतांच्या हस्ते पूजा, त्रीशरण पंचशील व बुध्द वंदनेने करण्यात आली. भारत देशाची प्रगती ही येणाऱ्या काळात तरुण युवा पिढीच्या हातात आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाचा स्तर विध्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणामुळे वाढणार आहे. त्यासाठी आधुनिक काळातील शिक्षण पद्धती सरकारने मजबूत करायला हवी. त्याकरिता शासनाने तरुणांना प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे. शिक्षणा शिवाय मनुष्य हा प्रगत होऊ शकत नाही. त्यामुळं सर्वांनी शिक्षण घ्यावे असेही भंतेजी म्हणाले. यावेळी भन्ते बुध्दशील यांचीही धम्म देशना संपन्न झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. देवदत्त सावंत यांनी केले. याप्रसंगी इयत्ता दहावी व बारावीमध्ये प्रविण्य प्राप्त विद्यार्थी-विद्यार्थीनीचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रा. देवदत्त सावंत, प्रज्वल कटारे, पारमिता कालेकर, पृथ्वी सोनवणे, गीत गायकवाड, सम्यक कांबळे, विशाखा टोम्पे, सृष्टी साळवे, साक्षी गुळवे, बोधिराज कांबळे, नैतिक गायकवाड, संकेत कांबळे, नम्रता गायकवाड, रागिणी शेळके, तेजस्विनी वाघमारे, साक्षी वाघमारे, अपेक्षा कांबळे, शर्वरी वाघमारे, दिव्या डोंगरे, उर्वेला वाघमारे, यशराज गायकवाड, स्वयंम शृंगारे, कृष्णकांत सुरवसे इत्यादीचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्तेश्वर थोटे यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे यांनी मानले. या प्रसंगी शोभा सोनकांबळे, निर्मला थोटे, रेखा सुरवसे, पंचशीला बनसोडे, स्वाती सूर्यवंशी, प्रज्ञा महिला मंडळच्या सर्व सदस्या, गौतम सूर्यवंशी, माऊली सुरवसे, सत्यप्रकाश कांबळे, राजू सूर्यवंशी, राहुल शाक्यमुनी, पांडुरंग अंबुलगेकर, सतीश कांबळे, विशाल वाहुळे, निलेश बनसोडे आदिसह मोठ्या संख्येने उपासक उपासिका उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिरुद्ध बनसोडे, करण ओव्हाळ, मिलिंद धावारे तसेच महाविहार धम्म संस्कार केंदद्राच्या सर्व धम्मसेवकांनी परिश्रम घेतले.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे