कळंब – कळंब तालुक्यातील अनेक भूमीहीन नागरिकांना रेशन कार्ड आहेत, परंतु सदरील रेशन कार्ड ऑनलाईन झाली नसल्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काच्या धान्यांपासून वंचित राहावे लागत असल्यामुळे त्यांची उपासमार होऊ लागली आहे. त्यामुळे मानव अधिकार आंदोलन संघटनेच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देऊन तात्काळ धान्य सुरू करावे अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,कळंब तालुक्यातील अनेक भुमीहीन लाभधारक यांनी तहसील कार्यालय मध्ये रेशनकार्ड आँनलाईन करण्यासाठी आधार कार्ड,रेशन कार्ड व इतर आवश्यक लागणारे कागदपत्रे देऊन सुद्धा कार्यालयाच्या वतीने सदरील रेशन कार्ड ऑनलाइन होत नाहीत. तर ऑनलाईन नसल्यामुळे रेशन धान्य दुकानातून त्यांना धान्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे अनेक भूमीहीन नागरिकांची उपासमार होऊ लागली आहे. त्यामुळे अशा भुमीहिन रेशनकार्ड लाभधारकांची शोध मोहीम राबवून त्यांची कार्ड तात्काळ आँनलाईन करावेत अशी मागणी केली आहे.तर सदरील रेशन कार्ड आँनलाईन नसल्याने अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. ऑनलाईन करण्यासाठी पुरवठा विभागाला आवश्यक लागणारी कागदपत्रे आवक- जावक विभागाला दिली असतानाही सदरील कागदपत्रेही गहाळ होऊ लागली आहेत. तर पूरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कडूनही मनमानी पद्धतीने काम चालू असुन त्यांच्याकडेही गेलेली कागदपत्रे गहाळ होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना दोन दोन वेळा कागदपत्रे द्यावी लागत आहेत. तर विनाकारण नागरिकांना त्रास व कुचंबना सहन करावी लागत असल्याने नागरिकांतुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच या विषयावर मानव अधिकार आंदोलन संघटनेच्या वतीने दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी निवेदन देऊन तालुक्यातील भूमीहीन नागरीकांसह इतरही नागरिकांची रेशनकार्ड ऑनलाईन असलेल्यांची शोध मोहीम राबवून रेशनकार्ड ऑनलाईन करून धान्य उपलब्ध करण्याची मागणी केलेली असताना सुद्धा सदरील निवेदनावर तहसील कार्यालयाच्या वतीने कसल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही किंवा तसे माहीतीस्तव पत्रही दिलेले नाही. त्यामुळे सदरील विषयावर जिल्हाधिकारी यांनी योग्य कारवाई करून कळंब तालुक्यातील भूमीहीन रेशन कार्डधारकांना तात्काळ न्याय देऊन रेशन कार्ड ऑनलाइन करून त्यांना धान्य उपलब्ध करावे अशी मागणी करण्यात आली आहे. धान्य उपलब्ध न झाल्यास संघटनेच्या वतीने कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. सदरील निवेदनावर मानव अधिकार आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे,अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण भाऊ कांबळे, तुळजापूरचे सामाजिक कार्यकर्ते किशोर भाऊ लोंढे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश