कळंब – किसनलाल जाजू व गोविंद जाजू स्मृति समारोह आयोजित कळंब शहरातील इयत्ता दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव व जगप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठलराव लहाने यांचे करिअर गायडन्स कार्यक्रम ३० जून २०२४ रोजी वार – रविवार वेळ -दुपारी ठीक १ वाजता कळंब शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. लहान मुलांच्या व्यंगावर हजारो मोफत शस्त्रक्रिया करून त्यांच्या ओठावर हसू फुलवणारे जगप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने हे स्वतःवरील दिवशी व वरील ठिकाणी आपल्या आयुष्याचा यशस्वी प्रवास स्वतः उलगडून सांगणार तर आहेतच पण त्याचबरोबर पालक,विदयार्थी यांना करिअरबाबत विशेष मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम गुणवंताच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारा, त्यांना प्रोत्साहन देणारा तर आहेच पण त्याचबरोबर प्रत्येक पालकांना विद्यार्थ्यांना पुढील दिशा देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर हे तर प्रमुख अतिथी म्हणून दत्तात्रय काळे ( प्रभारी शिक्षणाधिकारी जी प मा धाराशिव ), सुरेश टेकाळे ( अध्यक्ष धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघ ),धर्मराज काळमाते ( गटशिक्षणाधिकारी कळंब ),किशोर पानसे ( दयानंद महाविद्यालय लातूर ) यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात कळंब शहरातील इयत्ता दहावी गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी,पालक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कै.किसनलाल जाजू व कै.गोविंद जाजू स्मृती समारोह समिती कळंबच्या वतीने करण्यात आले आहे.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश