कळंब – अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार काळाची गरज वृक्ष लागवड व वटपौर्णिमा याचे औचित्य साधून आज दिनांक २१ जून २०२४ रोजी धाराशिव जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी केली. हा वृक्ष रोपणाचा कार्यक्रम धाराशिव जिल्हा महिला अध्यक्ष श्रीमती सरला ताई खोसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. वृक्षारोपणासाठी सबंध जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांनी उत्कृष्ट काम केले. श्रीमती सरलाताई खोसे यांनी कळंब शहरातील तहसीलदार बाबा दर्गा येथे झालेल्या नवीन रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी केली. या प्रसंगी दत्तात्रय तनपुरे, शहराध्यक्ष भैय्यासाहेब खंडागळे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमर मडके,युवती तालुकाध्यक्ष राधाताई शिंदे इतर महिला उपस्थित होत्या.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी