धाराशिव(जिमाका) – शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सुशिक्षित बेरोजगार /नोकरी इच्छुक उमेदवार यांना नोकरी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून सोमवार, 24 जून रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धाराशिव व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,धाराशिव यांचे संयुक्त विद्यमाने पुष्पक मंगल कार्यालय, नाईकवाडी नगर,धाराशिव येथे जिल्ह्यातील उमेदवारांसाठी “पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जॉब सिकर रजिस्ट्रेशन (एम्प्लॉयमेंट नोंदणी) करुन वैयक्तिक माहिती,शैक्षणिक पात्रतेचा तपशील,आधार क्रमांक, मोबाईल,ई-मेल,पत्ता अद्यावत करावा. त्यानंतर रोजगार मेळाव्यात ऑनलाईन नोंदणी करावी. तरी जिल्ह्यातील उमेदवारांनी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावामध्ये जास्तीत जास्त इच्छुकांनी सहभागी व्हावे व अधिक माहितीसाठी कार्यालयाचे दूरध्वनी क्र, 02472-299434 वर संपर्क साधावा.असे आवाहन सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव यांनी केले आहे.
More Stories
निरोगी गावाकडे वाटचाल;मौजे बोरफडी येथे ‘अनिमिया मुक्त गाव’ उपक्रमाचा भव्य शुभारंभ
ग्रामोदय समितीच्या संचालकपदी उद्योजक गुंडू पवार यांची एकमताने निवड
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात अभिवादन