कळंब (माधवसिंग राजपूत) – कळंब शहरातील कसबा पेठ भागातील बंडू कदम यांच्या घरातील घरगुती गॅस सिलेंडर चा स्फोट झाल्याने घरातील भांडी ,सामान जळून खाक झाल्याने कुटुंबीयाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक १७ जून रोजी सकाळी दहा च्या सुमारास गॅस एजन्सीच्या वतीने गॅस सिलेंडर जोडणी करण्यात आली. यानंतर घरातील महिला रंजना कदम गॅस पेटवीत असताना अचानक गॅस सिलेंडर ने पेट घेतला व त्याचा स्फोट झाला या मुळे लागलेल्या आगीत घरातील संसार उपयोगी भांडे, वस्तू व इतर सामान जळून खाक झाले.घराच्या पत्र्याच्या आडूने देखील पेट घेतल्याने पत्रे कोसळले परिसरातील लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे गॅस एजन्सीच्या प्रतिनिधीने दूरध्वनी द्वारे एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना बोलावले. आग आटोक्यात येत नव्हती तर कळंब नगरपरिषद अग्निशामक दलाची टीम घटनास्थळी पोहोचण्यास एक ते दीड उशीर झाला असल्याने नगर परिषदेच्या कार्यपद्धतीवर नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी