August 9, 2025

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ

  • धाराशिव (जिमाका)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजना (कर्ज मर्यादा रक्कम 1 लाख) तसेच केंद्र शासनाकडुन राबविण्यात येत असलेली पीएम अजय योजनेचे कर्ज प्रस्ताव अर्ज गरजू लाभार्थ्याकडून ऑनलाईन मागविण्यात येत आहे. याकरिता पोर्टल विकसित केले असून त्याची www.lokshahir.in हे संकेतस्थळ आहे.

    मातंग समाज व तत्सम 12 पोटजाती आहेत.मांग,मातंग,मिनी मादीग, मादींग,दानखणी मांग,मांग महाशी, मदारी,राधेमांग,मांग गारुडी,मांग गारोडी,मादगी,मादिगा या जातीतील इच्छुक अर्जदारांनी योजनेचे कर्ज मागणी अर्ज ऑनलाईनव्दारे सादर करावे.या योजनेत अर्ज भरतांना पोर्टलबाबत काही अडचण आल्यास मोबाईल नं.- 9272173469 वर सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क साधावा.असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मण क्षीरसागर यांनी केले आहे.

error: Content is protected !!