August 9, 2025

कळंब तहसिल कार्यालयाकडुन नवीन ई पाॅस मशीन चे वाटप

  • कळंब – कळंब तालुक्यातील १४३ रास्त भाव दुकानाला तहसिल कार्यालयाकडुन ई पाॅश मशीनचे वाटप दि.११ जून २०२४ रोजी कळंब पुरवठा विभागाचे तहसीलदार मुस्तफा खोदे यांच्या हस्ते करण्यात आले.
    अंगठा लागत नाही, पावती निघत नाही,मशीन बंद पडते अशा अनेक तक्रारी मुळे रास्त भाव दुकानदार व लाभार्थी त्रस्त झाले होते. या भंगार व डबड्या झालेल्या मशीन कधी बदलणार? अशी मागणी ही करत होते.त्या मुळे आज प्रत्यक्ष १४३ रास्त भाव दुकानदार यांना मशिन वाटप करण्यात आल्या आहेत. सदरील जुन्या मशीन जिल्हा पुरवठा विभागाकडून दहा वर्षांपूर्वी देण्यात आलेल्या होत्या. जुन्या मशीन बदलून नवीन मशीन देण्याचा निर्णय ही शासनस्तरावरून घेण्यात आला आहे. या जुन्या मशीन रास्त भाव दुकानाला २०१४ मध्ये देण्यात आल्या होत्या. त्याचा वापर जुन २०२४ पर्यंत झाला आहे. या मशीन सतत बंद पडत होत्या. त्यामुळे धान्य वितरण करीत असताना अडथळा निर्माण होत असे व वेळ ही वाया जात होता. गेल्या महीनाभरापुर्वी नवीन मशीन तहसिल कार्यालयाला उपलब्ध झाल्या होत्या परंतु मशीन वाटपाचे मुहूर्त मात्र सापडत नव्हते या मशीनचे वाटप लवकर करावे म्हणुन नागरीकांकडुन व वृत्तपत्रांच्या माध्यमातून मागणी करण्यात येत होती. तर कळंब तालुका तहसील कार्यालय पुरवठा विभागाकडून रास्ता भाव दुकानदारास संदेश पाठवले जात होते. या संदेशा मध्ये जुन्या मशीन सोबत दिलेली स्पेअर आंटिना,QR
    कोड स्कॅनर ,चार्जर, मशीन या सर्व वस्तू नविन मशीन वाटप करते वेळी जमा कराव्यात. त्यासाठी सर्वांनी वरील वस्तू एकत्रित करून ठेवावे मशीन वाटपाचा संदेश दिला जाईल. त्यावेळी वरील वस्तू घेऊन याव्यात असे संदेश रास्तभाव दुकानदारास पाठवले जात होते. परंतु या नवीन मशीन कधी मिळणार? याची उत्सुकता रास्त भाव दुकानदार व नागरिकांना लागली होती. परंतु आज दि.११ जुन रोजी नवीन मशीन चे वाटप झाल्याने स्वस्त धान्य दुकानदार व नागरीकांकडुन समाधान व्यक्त होत आहे. या वेळी पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार मुस्तफा खोंदे, अव्वल कारकुन आर.डी.पवार, व्हिजेनटेक जिल्हा समन्वयक पृथ्विराज माने,जालना समन्वयक शुभम नारळे, तालुका समन्वयक अंकुश झोंबाडे, ऑपरेटर गणेश आडसुळ,श्रीमती मोटे, रास्त भाव संघटनेचे अध्यक्ष ए.एस.बोदर,जयश्री जाधव यांच्या सह स्वस्त धान्य दुकानदार यावेळी उपस्थित होते.
  • @ सॉफ्टवेअर सुविधा युक्त असेल नवीन मशीन –
    नवीन मशीन याद्यावत असून यात सॉफ्टवेअर सुविधा आहे जुन्या मशीन मध्ये ८५ वर्षांपुढील लाभार्थ्यांचा अंगठा लागत नसे परंतु या नवीन मशीन मध्ये आय हे बटन दाबल्यास डोळ्याच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्याची ओळख पटेल त्यामुळे सतत निर्माण होणारी अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.नवीन मशीन ही ४ जी असुन त्यामध्ये २ सीम एअरटेल व जिओ या कंपनीचे कार्ड आहेत, तर वुदध व्यक्तीकरीता आय स्कॅनर आहे.
  • – मुस्तफा खोंदे
    नायब तहसीलदार पुरवठा विभाग
error: Content is protected !!