धाराशिव (जिमाका) – 12 जुन हा जागतिक बाल कामगार विरोधी दिवसानिमित्ताने जिल्ह्यात पुढील कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. जिल्हा कार्यक्षेत्रातील बाल कामगार बहूलक्षेत्र निश्चित करणे,जिल्ह्यातील विटभट्टी येथे भेटी देवून तपासणी करणे आणि मालकांकडून/चालकाकडून बालकामगार न ठेवणेबाबतचे हमीपत्र लिहून घेणे, जिल्ह्यातील हॉटेल असोसिएशन यांच्या बैठका घेऊन त्यांना सुधारीत बालकामगार अधिनियमाबाबत माहिती देणे,सर्व व्यवसायातील व्यापारी संघटनाचे एकत्रित चर्चासत्र घेणे,बाल कामगार प्रथेविरुद्ध बाजारपेठ क्षेत्रात रॅली काढणे, सार्वजनिक ठिकाणी बालकामगार अधिनियमाबाबत जनजागृती करणे, जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना येथे बालकामगार कामावर न ठेवण्याबाबत स्टीकर/पॉम्प्लेट तयार करुन प्रदर्शित करणे,औद्यागिक क्षेत्रातील सर्व मालक संघटनांची बैठक घेऊन तेथे बाल कामगार प्रथेविरुद्ध चर्चा करुन जनजागृती करणे.त्यांना बालकामगार कामावर ठेवू नये म्हणून सामुदायिक शपथ कार्यक्रम आयोजित करणे, बालकामगारांशी निगडित काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था,अंगणवाडी सेविका,आशा सेविका यांच्या सहकार्याने अत्यल्प उत्पन्न असलेल्या क्षेत्रामध्ये पालकांचे प्रबोधन करणे, पत्रके वाटणे,वस्तीमधील लोकांना बालकामगार निर्मुलन कार्यक्रमात सामावून घेण्यात येईल. सर्व शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना घरेलू कामगार म्हणून बाल कामगारांना न ठेवण्याबाबत आवाहन करणे,प्रत्येक जिल्हा कार्यालयाने त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी/अधिकाऱ्यांना बाल कामगार प्रथेविरुद्ध संवेदनशिल करण्याकरीता कार्यक्रमांचे आयोजन करणे इत्यादी. तसेच बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसाय / प्रक्रियेत कामावर ठेवणे तसेच 14 वर्षे पूर्ण न झालेले किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियामध्ये कामावर ठेवणे गुन्हा आहे.जर मालकाने/नियोक्त्याने बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर, ठेवल्यास त्यांस 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावास किंवा 20 हजार रुपये ते 50 हजार रुपयेपर्यंत दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते.त्यामुळे बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवु नये.असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे यांनी केले आहे.
More Stories
अखिल भारतीय महापशुधन एक्स्पो २०२६ च्या लोगोचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते अनावरण
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन