August 9, 2025

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानात 2181 मातांची विनामुल्य तपासणी

  • धाराशिव (जिमाका)- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दर महिन्याच्या 9 तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान व 22 तारखेस मातृत्व संवर्धन दिन सर्व शासकिय आरोग्य संस्थांमधून राबविण्यात येतो.यादिवशी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी यांचेकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील गरोदर मातांची आरोग्य तपासणी करून उपचार केले जातात. नुकत्याच आयोजित शिबिरात 2181 मातांची विनामुल्य तपासणी करण्यात आली.
  • या तपासणीवेळी काही माता या जोखमीच्या आढळून आल्या.त्यांची तपासणी स्त्रीरोगतज्ञांकडून होणे आवश्यक असल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.एल.हरिदास यांचे संकल्पनेतुन खाजगी स्त्रीरोगतज्ञांचा सहभागासाठी खाजगी स्त्रीरोगतज्ञांच्या संघटनेच्या अध्यक्षा डॉ.ललीता स्वामी यांचे माध्यमातून जिल्हयातील सर्व खाजगी स्त्रीरोगतज्ञांना त्यांना सोईस्कर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एक दिवस सेवा देणेबाबत आवाहन करण्यात आले होते.
  • या आवाहनास स्त्रीरोगतज्ञ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने बऱ्याच प्रा.आ.केंद्रात तपासणी सेवा उपलब्ध करून दिल्या.माहे जानेवारी 2024 ते 22 में 2024 अखेर जिल्हयातील 27 प्राथमिक आरोग्य केंद्रातून 25 खाजगी स्त्रीरोगतज्ञ यांनी 2181 मातांची विनामुल्य तपासणी करण्यात आली.
  • 29 मे रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष यांचे हस्ते खाजगी स्त्रीरोगतज्ञांचा गौरव करण्यात आला.एफओजीएसआय या खाजगी स्त्रीरोगतज्ञांच्या संघटनेच्या अध्यक्षा डॉ.ललीता स्वामी यांना अभिनंदन पत्र देण्यात आले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिदास यांनी सेवा देणाऱ्या स्त्रीरोग तज्ञांना जि.प.सेस योजनेतुन मानधन देणेबाबत प्रस्ताव ठेवला असता त्यास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.घोष यांनी मान्यता देवून भविष्यात सर्वच प्राथमिकत आरोग्य केंद्रात सेवा देणेबाबत स्त्रीरोगतज्ञ यांना आवाहन केले.
  • कार्यक्रमाचे प्रास्तावीक डॉ.कुलदीप मिटकरी यांनी केले.कार्यक्रमाची सविस्तर माहिती डॉ.एस.एल.हरिदास जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.सेवा उपलब्ध करून दिल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.घोष यांनी सर्व स्त्रीरोगतज्ञांचे अभिनंदन केले.
  • या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष,जिल्हा आरोग्य अधिकार डॉ.एस.एल. हरिदास,जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी,निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.शिवाजी फुलारी, खाजगी स्त्रीरोग तज्ञांच्या संघटनेच्या अध्यक्षा डॉ.ललीता स्वामी,डॉ.वसुधा दापके, डॉ.निता पौळ,डॉ. नितु मलबा,डॉ. सिमा वळे,डॉ.तावशीकर यांचेसह आरोग्य विभागाचे अधिकारी/कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!