August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलिसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.08 जुन रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 187 कारवाया करुन 1,44,500 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • वाशी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान वाशी पोलीसांनी दि07.06.2024 रोजी 23.25 वा. सु. वाशी पोलीस ठाणे हद्दीत मांडवा येथील सुभाष माधवराव देशमुख यांचे पत्रा शेडचे पाठीमागे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-शंकर विलास जाधव, वय 32 वर्षे, रा. वाशी, अनिल भिमराव शिंदे, बिरु उत्तम पवार, वय 32 वर्षे, अजिनाथ आबा शिंदे, वय 50 वर्षे, नितीन विश्वास शिंदे, वय 21 वर्षे, रा. मांडवा ता. वाशी जि. धाराशिव हे 23.25 वा. सु. मांडवा येथील सुभाष माधवराव देशमुख यांचे पत्रा शेडचे पाठीमागे तिरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 5,090 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान नळदुर्ग पोलीसांनी दि08.06.2024 रोजी 16.15 वा. सु. उमरगा पोलीस ठाणे हद्दीत पठाण पंक्चर दुकानाचे बाजूस गुंजोटी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-बसवराज सुधाकर ठेके, वय 44 वर्षे, रा. कंठेकुर ता. उमरगा जि. धाराशिव हे 16.15 वा. सु. नळदुर्ग गावातील बसस्थानक बाजूला कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 930 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • येरमाळा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि08.06.2024 रोजी 17.30 वा. सु. येरमाळा पोलीस ठाणे हद्दीत येरमाळा बसस्थानक समोरील संगम हॉटेल जवळ छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-मनोज अशोक बारकुल, वय 37 वर्षे, रा. सोनारगल्ली येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव हे 17.30 वा. सु. येरमाळा बसस्थानक समोरील संगम हॉटेल जवळ कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,500 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) दशरथ मिटु पवार, वय 40 वर्षे, 2) लाला शामराव इटकर वय 34 वर्षे, गणेश दिलीप पवार, वय 38 वर्षे, रा. येडशी ता. जि. धाराशिव हे तिघे दि.08.06.2024 रोजी 17.40 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 15 बी. क्यु 5198 ही येडशी येथील दिल्ली दरबार चौक येथे बार्शी ते लातुर रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185, 177 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • कळंब पोलीस ठाणे: आरोपी नामे- महेश गंगाधर खराडे, गणेश गंगाधर खराडे, गंगाधर सदाशिव खराडे सर्व रा.आथर्डी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.07.06.2024 रोजी 20.15 वा. सु. आथर्डी बसस्थानकासमोर फिर्यादी नामे- मन्मथ रावसाहेब झटाळ वय 35 वर्षे, रा. आथर्डी, ता. कळंब जि. धाराशिव यांना मागील भांडनाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी गज, खोऱ्याचा दांड्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मन्मथ झटाळ यांनी दि. 08.06.2024 रोजी दिलेल्या पथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 326, 323, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ फसवणुक.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे: आरोपी नामे-अनिल लक्ष्मण हिप्परगे रा. फुलवाउी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 01.08.2022 ते दि. 20.04.2023 रोजी पावेतो फुलवाडी तुळजापूर येथे फिर्यादी नामे- तानाजी सुभाष हांडगे, वय 36 वर्षे, फुलवाउी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीचे गावाशेजारील एक एक्कर ची प्लॉटींग मध्ये दोन प्लॉट नावावर करुन देतो असे म्हणुन तानाजी शिंदे यांना विश्वासात धेवून रोख रक्कम 4,00,000₹ घेवून आज पावेतो प्लॉटींग नावावर न करुन देता शिंदे यांचे पैसे परत न करता विश्वासघात करुन फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- तानाजी शिंदे दि. 08.06.2024 रोजी दिलेल्या पथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 420 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ रस्ता अपघात.”
  • वाशी पोलीस ठाणे: जखमी नामे-अंकुश लक्ष्मण तातुडे, व अमर मोहन सुबुगडे रा. पारगाव ता. वाशी जि. धाराशिव हे दोघे दि. 14.05.224 रोजी 07.45 वा. सु. पारगाव रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 25 ए.झेड 8971 वरुन जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 25 ए.वाय 6631 च्या चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून अंकुश तातुडे यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात अंकुश तातुडे, अमर सुबुगडे हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शुभम अंकुश तातुडे, वय 27 वर्षे, रा. पारगाव, ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.08.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, सह कलम 184, मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
error: Content is protected !!