August 9, 2025

नळदुर्ग वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज मागविले

  • धाराशिव (जिमाका) – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नळदुर्ग ता.तुळजापूर येथील वसतीगृहात नवीन प्रवेश करण्याकरिता प्रवेश अर्ज वाटप सुरु आहे.
    शालेय विद्यार्थी,कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय व व्यावसायीक महाविद्यालयात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज वाटप सुरु आहे.गरजु व गरीब विद्यार्थ्यांना राहण्याची व भोजनाची व सकाळी नाष्टयाची तसेच सर्व सोयी सुविधाची विनामुल्य आहे.शालेय विद्यार्थी यांना शालेय गणवेश 1000 रुपये,छत्री, गमबुटा-500 रुपये शालेय स्टेशनरी प्रति महिना 500 रुपये प्रमाणे निर्वाह भत्ता दिला जातो. महाविद्यालय विद्यार्थ्यांना 2000 रुपये व छत्री-500 रुपये, स्टेशनरी-4000 रुपये,निर्वाह भत्ता – 500 /- रुपये रक्कम त्यांच्या बॅक खात्यावर दिली जाते.तरी गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज सादर करावेत. असे आवाहन गृहपाल,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,नळदुर्ग यांनी केले आहे.
error: Content is protected !!