धाराशिव (जिमाका) – जिल्हा रेशीम कार्यालयातील क्षेत्र सहाय्यक बी.एन.सूर्यवंशी यांनी बील काढण्यासाठी पैसे मागितल्याचे वृत्त एका समाजमाध्यमावर प्रसारित झाले होते.त्या अनुषंगाने सूर्यवंशी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.नोटिसीबाबत खुलासा सादर करून सूर्यवंशी यांनी सदर रक्कम त्यांच्या वैयक्तिक व्यवहाराची असून त्याचा रेशीम शेतकऱ्यांशी किंवा रेशीम कार्यालयाशी काहीही संबंध नसल्याचे कळविले होते.जिल्हा रेशीम कार्यालयाने सूर्यवंशी यांचा खुलासा उपसंचालक,प्रादेशिक रेशीम कार्यालय,छत्रपती संभाजीनगर यांना कळविला.संचालक,रेशीम संचालनालय,नागपूर यांनी त्यांना प्राप्त माहितीच्या आधारे क्ष्रेत्र सहायक सूर्यवंशी यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील तरतुदीनुसार 24 मे 2024 पासून निलंबित केले असल्याची माहिती रेशीम विकास अधिकारी, धाराशिव यांनी दिली.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान