गोविंदपुर (अविनाश सावंत ) – कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील संभाजी विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षा निकाल ९७.६७ टक्के लागला. शाळेतील एकूण 43 विद्यार्थ्यापैकी 14 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.या सर्व गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. त्यापैकी 20 विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. तर 14 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.आणि 08 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. यामध्ये श्रीशा कापसे,श्रेया भराडे, योगेश बनसोडे ,अमृता कुंभार,प्रगती निंबाळकर, जयसिंह काळे,अभिषेक कांबळे, दिव्या निंबाळकर,हर्षदा जगताप, ऋतुजा काळे,आकांक्षा भराडे , आदिती थोडसडे, दिव्या जाधव, राजरत्न आव्हाड, प्रतीक्षा मुर्गे, प्रतीक मडके,अस्लम पठाण , साक्षी जगताप,प्राची माळी, आरती कांबळे हे विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाले. तर शाहीद शेख, साक्षी चव्हाण, अभिजीत भिसे, सिद्धी घाडगे, स्वप्निल काळे, दीपक रितापुरे, खंडू बनसोडे, प्रणिता कुंभार, अश्विनी भराडे,अभिजीत झांबरे, चैतन्य काळे, रियाज पठाण, प्रतीक जाधव, आरब पठाण, हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर एकूण 08 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण . यावेळी संस्थेचे अध्यक्ष अच्युतराव पाटील उपाध्यक्ष शहाजी रीतापुरे, सचिव रामेश्वर वाघमारे, मुख्याध्यापक दत्तात्रय वाघमारे, भारतीय स्टेट बँक शाखेचे शाखा व्यवस्थापक शिवशंकर खुळे, सुनील गुळभिले, सुभाष वाघमारे, विशाल वाघमारे, जयश्री वाघमारे, नवनाथ मडके, उत्तम कांबळे, शिवाजी जाधव, आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. तर हज्जू शेख, बाळासाहेब काळे,श्रीराम कापसे,अशोक कुंभार, जीवन चव्हाण, राहुल आव्हाड आदी पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज शीलवंत यांनी केले.तर आभार प्रदर्शन जगदीश घोगरे यांनी मानले.
More Stories
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका प्रा.सौ.अंजलीताई मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट