धाराशिव – राजकीय परिवर्तना सोबत दीर्घकालीन सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाला चालना देण्यासाठी आणि तशा पद्धतीचे वातावरण महाराष्ट्रात तयार करून मनुवादी आणि विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या शक्तींना सत्तेतून पायउतार करण्याच्या अनुषंगाने परिवर्तनवादी विचारांच्या संघटनांनी भारत जोडो अभियान प्रक्रिया देशभर सुरु केली आहे. हि प्रक्रिया महाराष्ट्रात हि सुरु झाली असून या प्रक्रियेचा भाग आणि पुढील रणनीती ठरविण्याच्या उद्देशाने भारत जोडो अभियान सोलापूर जिल्हा कार्यकर्ता बैठकीचे आयोजन १० आक्टोबर रोजी सगुणा मंगल कार्यालय, तांदुळवाडी (माळशिरस) या ठिकाणी केले असल्याची माहिती या बैठकीचे निमंत्रक शोभा करांडे,अँड.सविता शिंदे आणि ललित बाबर यांनी दिली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना जे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नव्हते,ज्यांना या देशाचे संविधान मान्य नव्हते तेच सत्तेत आहेत. त्यामुळेच संविधानिक मूल्ये सध्याच्या राजवटीतपायदळी तुडवली जाण्याचा अनुभव आपण वारंवार घेत आहोत.लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, लोकशाही यंत्रणांचे खच्चीकरण सुरू आहे.देशातील अल्पसंख्याक, आदिवासी,दलित व महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणावर सुरूच आहेत.एका बाजूला बहुजन समाजाच्या शिक्षणाच्या वाटा बंद करत,लोकशाही व्यवस्थाच संपवण्याचा डाव सातत्याने सुरू आहे. देशातील बेरोजगारी व विषमता शिगेला पोहोचली आहे. शिव-फुले-शाहू आंबेडकर-सावित्रीबाई आणि अहिल्यामाई-फातिमा यांचे सामाजिक न्याय, समानता आणि बंधुताचे विचार नष्ट करून संविधानाने दिलेले अधिकार छुप्या पद्धतीने नाकारण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात पुन्हा एकदा मनुस्मृती लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे.अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारले जात आहे.अनेक सामाजिक विचारवंत,साहित्यिक, कलाकार,प्रामाणिक अधिकारी दडपणाखाली असल्याचे पाहवयास मिळत आहे.गेल्या ९ वर्षात सर्व स्तरावर देशाची पीछेहाट सुरु आहे. अशा परस्थितीत महाराष्ट्रात भारत जोडो अभियान हि चळवळ सुरु झाली आहे. लोकांच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने मूल्याधारित प्रजासत्ताक आणि आणि देशाची एकता आणि बंधुता आबाधित राखण्यासाठी,राजकीय बदलापासून सामाजिक-सांस्कृतिक बदलांना चालना देण्यापर्यंत आणि वातावरणातील बदलांशी लढा देण्यापर्यंत आपल्या कार्य क्षितिजाचा विस्तार करण्यासाठी तसेच प्रत्येक भारतीयासाठी न्याय, स्वातंत्र्य,समता,आणि बंधुत्वाचे घटनात्मक वचन सुरक्षित राखण्यासाठी भारत जोडो अभियान हि चळवळ उभी रहात आहे. आपण २०२४ मध्ये लोकशाहीतील निवडणुकीच्या कसोटीला सामोरे जाणार आहोत. २०२४ मधे महाराष्ट्रातील प्रगतीशील परंपरा मानणारे नागरिक, कार्यकर्ते,चिंतनशील व्यक्ती काही बदल घडवू शकतील तसेच देशाला पुन्हा ख-या अर्थाने संविधानिक वाटेवर आणू शकतील या अपेक्षेने हि चळवळ महाराष्ट्रभर वाटचाल करत आहे. काही महिन्यापूर्वी कर्नाटक राज्यात अशा प्रयोगाने तेथील जातीयवादी आणि विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या सरकारला पायउतार व्हावे लागले आहे. तो आत्मविश्वास घेऊन महाराष्ट्रभर काम करणाऱ्या परिवर्तनशील विचारांच्या कार्यकर्त्यांची फळी बांधण्याचे काम सुरु आहे. हि चळवळ तळागाळातील प्रत्येक घटका पर्यंत पोहचवणे आवःय्क आहे.याचाच भाग म्हणून १० आँक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्यात असणाऱ्या सोलापूर, माढा आणि उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील काही भाग यातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीस परिवर्तनवादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी तसेच या मनुवादी, शक्तींना सत्तेतून त्यासाठी पायउतार करणे आवश्यक आहे असे वाटणाऱ्या आणि या बाबत अस्वस्थ आणि चिंतनशील असणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्यने या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात